नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : नोव्हेंबर (November) महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दिवाळी (Diwali) असून हा महिना सण ( Festival) आणि उत्सवाने भरलेला आहे. या महिन्यात खासगी आणि सरकारी बँकांना ( private and government banks) लागोपाठ सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळेच जर तुमचं बँकेत काम असेल, तर या महिन्यात बँकांना किती दिवस आणि कोणत्या दिवशी सुट्टी (Bank Holidays) आहे हे जाणून घ्या. नोव्हेंबर महिन्यात तब्बल 17 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. हे सुट्टीचे दिवस लक्षात घेऊन आत्तापासूनच कामाचं नियोजन करावं. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही महत्त्वाच्या कामात अडथळा येणार नाही.
नोव्हेंबर महिन्यात धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छठ पूजा, गुरुनानक जयंती अशा विविध सण-उत्सवाच्या सुट्ट्या बँकांना असणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात एकूण 17 दिवस बँका बंद राहतील. यापैकी बहुतांश सुट्ट्या या सलग आल्या आहेत. त्यामुळेच बँकेसंबंधी तुमचं एखादं महत्त्वाचं काम असेल तर लवकरात लवकर करणं गरजेचं आहे.
अशा आहेत सुट्ट्या -
1 नोव्हेंबर - कन्नड राज्योत्सव/कुट (बंगळुरू आणि इंफाळमध्ये बँका बंद)
3 नोव्हेंबर - नरक चतुर्दशी (बंगळुरूमध्ये बँका बंद)
4 नोव्हेंबर - दीपावली / लक्ष्मीपूजन (बंगळुरू सोडून सर्व राज्यात बँका बंद)
5 नोव्हेंबर - बलिप्रतिपदा / विक्रम संवत नवीन वर्ष / गोवर्धन पूजा (अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, डेहराडून, गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई आणि नागपूर येथे बँका बंद )
6 नोव्हेंबर - भाऊबीज / चित्रगुप्त जयंती / लक्ष्मी पूजा / दिवाळी / निंगोल चाकोबा (गंगटोक, इंफाळ, कानपूर, लखनौ आणि शिमला येथे बँका बंद)
7 नोव्हेंबर - रविवार (साप्ताहिक सुट्टी)
10 नोव्हेंबर - छठ पूजा (पाटणा आणि रांचीमध्ये बँका बंद)
11 नोव्हेंबर - छठ पूजा (पाटण्यात बँक बंद)
12 नोव्हेंबर - वंगल उत्सव (शिलाँगमध्ये बँका बंद)
13 नोव्हेंबर - दुसरा शनिवार
14 नोव्हेंबर - रविवार (साप्ताहिक सुट्टी)
19 नोव्हेंबर - गुरुनानक जयंती / कार्तिक पौर्णिमा - (एझोल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर येथे बँका बंद)
21 नोव्हेंबर - रविवार (साप्ताहिक सुट्टी)
22 नोव्हेंबर - कनकदास जयंती (बेंगळुरूमध्ये बँका बंद)
23 नोव्हेंबर - सेंग कुत्स्नाम (शिलाँगमध्ये बँका बंद)
27 नोव्हेंबर - महिन्यातील चौथा शनिवार
28 नोव्हेंबर रविवार (साप्ताहिक सुट्टी)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नोव्हेंबर महिन्यासाठी अधिकृत बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे, त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात 17 सुट्ट्या आहेत. या 17 दिवसांच्या सुट्टीमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवारी तसंच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्यांतर्गत, आरबीआयने 1, 3, 4, 5, 6, 10, 11, 12, 19, 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय महिन्यात चार रविवार आणि दुसरा आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असणार आहेत.
नोव्हेंबर महिन्यात बँकेला असलेल्या सुट्ट्यांची संख्या पाहता या महिन्यात बँकेसंबंधी काम करताना योग्य नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी तुमच्या शहरातील बँकांना कोणकोणत्या दिवशी सुट्ट्या आहेत, याची माहिती घेणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.