मुंबई, 15 फेब्रुवारी: बँकेत पैसे जमा करण्यासाठी डिमॅट खाते आवश्यक आहे. बँक खात्याशिवाय तुम्ही बँकेत पैसे जमा करू शकत नाही. त्याचप्रमाणे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डिमॅट खाते आवश्यक आहे. हे असे खाते आहे जिथे तुम्ही खरेदी केलेले शेअर्स ठेवता येतात. आजकाल शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आकडेवारीनुसार, देशातील एकूण डिमॅट खात्यांची संख्या 11 कोटींच्या पुढे गेली आहे. अशा परिस्थितीत वार्षिक आधारावर डीमॅट खात्यांच्या संख्येत 31 टक्क्यांनी वाढ झालीये. परंतु हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, यापैकी अनेक खाती खूप जुनी आहेत आणि वर्षानुवर्षे वापरली जात नाहीत. अनेक खाती सक्रिय नाहीत. अशा वेळी हे खाते कसे बंद करता येईल याविषयी सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
PPF मधून जास्त नफा कमावण्याची सोपी ट्रिक, होईल जास्त फायदा!वापरत नसलेले डिमॅट खाते बंद का करावे?
तुम्ही डीमॅट खाते वापरत नसाल तर ते बंद करणे हा एक चांगला पर्याय आहे कारण तुम्हाला डीमॅट खात्यावर दरवर्षी वार्षिक शुल्क भरावे लागते. जर तुम्ही हे खाते वापरत नसाल तर ते बंद करणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. डिमॅट खाते बंद करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया-
डिमॅट खाते कसे बंद करावे
डिमॅट खाते बंद करण्याची प्रक्रिया ऑफलाइनही आहे. यासाठी तुम्हाला NSDL च्या डीपी (Depository Participants) कार्यालयात जावे लागेल. यानंतर, येथे तुम्हाला खात्याशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे आणि फॉर्म सबमिट करावे लागतील. तुम्ही तेथून डीमॅट खाते बंद करण्याचा फॉर्म मिळवू शकता. याशिवाय तुम्ही ते डिपॉझिटरी पार्टिसिपंटच्या वेबसाइटवरूनही डाउनलोड करू शकता. यानंतर, तुम्ही ते भरून त्याच्या कार्यालयात जमा करू शकता. खाते बंद करताना तुम्हाला डीपी आयडी आणि क्लायंट आयडी द्यावा लागेल. यासोबत तुमचे नाव, पत्ता आदी तपशील भरावे लागतील. यासोबतच तुम्ही खाते का बंद करत आहात हे देखील सांगावे लागेल. यासोबतच, डीमॅट खाते बंद करण्याच्या क्लोजर रिक्वेस्ट फॉर्मवर साइन करणे देखील अनिवार्य आहे. यानंतर खात्यात जमा झालेले पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्यानंतर त्याची माहिती येथे भरावी लागेल.
‘या’ सरकारी बँकेचं डेबिट कार्ड वापरता? आता खिशाला बसणार झळकिती दिवसात खाते बंद होईल
तुम्ही डिमॅट खाते बंद करण्याची रिक्वेस्ट केल्यानंतर तुमचे खाते एकूण 10 दिवसांच्या आत बंद केले जाईल. हे खाते बंद करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. दुसरीकडे, जर तुमच्या खात्यात काही थकबाकी असेल, तर ती फी भरल्यानंतरच तुम्ही खाते बंद करू शकता. त्याशिवाय खाते बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.