जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Zomato, Paytm, Nykaa शेअर ऑलटाईम लो लेव्हलवर; तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी काय करावं?

Zomato, Paytm, Nykaa शेअर ऑलटाईम लो लेव्हलवर; तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी काय करावं?

Zomato, Paytm, Nykaa शेअर ऑलटाईम लो लेव्हलवर; तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी काय करावं?

पेटीएमचा स्टॉक त्याच्या इश्यू किंमतीपेक्षा 58 टक्क्यांनी खाली गेला आहे. झोमॅटोच्या शेअरची किंमत देखील त्याच्या इश्यू किंमत 76 च्या खाली व्यवहार करत आहे. पेटीएम शेअरची किंमत मंगळवारी विक्रमी नीचांकी पातळीवर गेली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 फेब्रुवारी : झोमॅटो, पेटीएम आणि नायका (Zomatom Paytm, Nykaa) यांसारख्या नवीन युगातील बहुतेक कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या ऑल टाईम लो लेव्हलवर ट्रेड करत आहेत. झोमॅटो आणि पेटीएमच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. स्टार हेल्थच्या स्टॉकची (Star Health Insurance Share) स्थितीही चांगली नाही. या कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या इश्यू किमतीच्या (Issue Price) अगदी खाली गेले आहेत. पेटीएमचा स्टॉक त्याच्या इश्यू किंमतीपेक्षा 58 टक्क्यांनी खाली गेला आहे. झोमॅटोच्या शेअरची किंमत देखील त्याच्या इश्यू किंमत 76 च्या खाली व्यवहार करत आहे. पेटीएम शेअरची किंमत मंगळवारी विक्रमी नीचांकी पातळीवर गेली. स्टार हेल्थचा शेअरही एका महिन्यात जवळपास 16 टक्क्यांनी खाली आला आहे. या कंपन्यांच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. पण लिस्टिंग झाल्यानंतर या कंपन्यांच्या शेअर्सनी अपेक्षित ताकद दाखवली नाही. लाइव्ह मिंटच्या अहवालानुसार, बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की झोमॅटो असो किंवा पेटीएम, त्यांचे मूल्यांकन खूप उच्च आणि तर्कहीन आहे. त्यामुळे या कंपन्यांचे शेअर्स उलटे पडत आहेत. विश्‍लेषकांचे म्हणणे आहे की, इक्विटी मार्केट सध्या जागतिक पातळीवर दबाव आहे. सतत तोटा देत असलेल्या अशा नव्या युगातील कंपन्यांमधून गुंतवणूकदार पैसे काढत आहेत. हे सर्वत्र घडत आहे. या अशा कंपन्या आहेत ज्यांना बाजारातील तेजीमुळे भरपूर मूल्यांकन मिळाले. Zomato नफा देऊ शकतो स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे ​​संशोधन प्रमुख संतोष मीना सांगतात की, नवीन काळातील बिझनेस मॉडेल्स असलेल्या या कंपन्यांचे व्हॅल्युएशन खूप महाग होते आणि त्यामुळेच बाजारात काही मोजकेच टिकून राहिले आहेत. मीना सांगतात की, सध्याच्या पातळीबद्दल बोलायचे तर झोमॅटो आणि स्टार हेल्थमध्ये गुंतवणूकदारांना दीर्घकालीन नफा देण्याची क्षमता आहे. गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये Nykaa देखील समाविष्ट करू शकतात. पण पेटीएमच्या शेअर्सबाबत संतोष मीना सांगतात की, हा शेअर कधी नफा देईल, हे आताच सांगता येणार नाही. मेहता इक्विटीज लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष (रिसर्च) प्रशांत तापसी म्हणतात की अलीकडेच लिस्टिंग झालेल्या नवीन युगातील बिझनेस कंपन्यांमध्ये विक्रीचा मोठा दबाव आहे. झोमॅटोच्या Q3 निकालांमध्ये ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू आणि जागतिक अनिश्चितता यामुळे झोमॅटोचे शेअर्स घसरत आहेत. जर जागतिक परिस्थिती सुधारली तर झोमॅटोचे शेअर्स येत्या काळात 80 ते 92 रुपयांपर्यंत चांगले ट्रेडिंग झोन पाहू शकतात. जोखीम न घेणारे गुंतवणूकदार सध्याच्या पातळीवर झोमॅटो खरेदी करू शकतात. स्टार हेल्थचे शेअर्सही एका महिन्यात 14 टक्क्यांनी घसरले आहेत. हे देखील अद्याप त्याच्या इश्यू आणि लिस्टिंग किंमतीच्या खाली आहे. ग्रीन पोर्टफोलिओचे संस्थापक दिवम शर्मा म्हणतात की स्टार हेल्थच्या आयपीओची किंमतही जास्त होती. कोरोना महामारीत कंपनीला मोठा धक्का बसला होता, कारण क्लेम खूप वाढले होते. याशिवाय बाजारातील उच्च स्पर्धेमुळेही कंपनीला फटका बसला. गुंतवणूकदारांनी आता या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रतीक्षा करावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात