मराठी बातम्या /बातम्या /मनी /EPFO News: पीएफचं मागील वर्षाचं व्याज लवकरच खात्यात जमा होणार? किती पैसे जमा झाले सोप्या पद्धतीने तपासा

EPFO News: पीएफचं मागील वर्षाचं व्याज लवकरच खात्यात जमा होणार? किती पैसे जमा झाले सोप्या पद्धतीने तपासा

PF Account: नोकरदार वर्गाला यावेळी सरकारकडून मोठा झटका देत पीएफवरील व्याज 40 वर्षांतील सर्वात कमी झाले आहे. 2021-2022 साठी हा दर 8.1 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

PF Account: नोकरदार वर्गाला यावेळी सरकारकडून मोठा झटका देत पीएफवरील व्याज 40 वर्षांतील सर्वात कमी झाले आहे. 2021-2022 साठी हा दर 8.1 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

PF Account: नोकरदार वर्गाला यावेळी सरकारकडून मोठा झटका देत पीएफवरील व्याज 40 वर्षांतील सर्वात कमी झाले आहे. 2021-2022 साठी हा दर 8.1 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

मुंबई, 7 एप्रिल : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नुकतेच पीएफवरील व्याजदर (PF Interest Rate) निश्चित केले आहेत. यावेळी व्याजदरात कपात करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा कमी व्याज मिळेल, ज्यांचे पैसे जूनपर्यंत तुमच्या खात्यात येऊ शकतात. तुमच्या पीएफ खात्यात (PF Account) किती रक्कम जमा झाली आहे हे पाहायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला SMS पाठवावा लागेल.

नोकरदार वर्गाला यावेळी सरकारकडून मोठा झटका देत पीएफवरील व्याज 40 वर्षांतील सर्वात कमी झाले आहे. 2021-2022 साठी हा दर 8.1 टक्के निश्चित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ईपीएफओच्या सुमारे 6 कोटी खातेधारकांना धक्का बसला आहे. या कपातीनंतर जूनपर्यंत तुमच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे येणे अपेक्षित आहे. तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक विविध प्रकारे तपासू शकता.

Online Transaction करताना चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले? चिंता करु नका, 'अशा' प्रकारे मिळवता येतील पैसे पुन्हा

SMS च्या मदतीने

ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून EPFO ​​UAN LAN (भाषा) 7738299899 वर पाठवावे लागेल. LAN म्हणजे भाषा. इंग्रजीत माहिती हवी असल्यास LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. हिंदीत माहितीसाठी तमिळसाठी HIN आणि TAM लिहून एसएमएस पाठवावा लागेल. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल.

तुम्ही मिस्ड कॉलवरूनही स्टेटस तपासू शकता

मिस्ड कॉलच्या (Missed Called) मदतीने तुम्ही तुमचा पीएफ शिल्लक देखील तपासू शकता. यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल करावा लागेल.

आता 50 रुपयांपेक्षा कमी रुपयांत पेट्रोल मिळणार नाही, पेट्रोल पंपावर लागल्या पाट्या

वेबसाइटवरूनही तपासू शकता

पीएफ शिल्लक स्थिती ऑनलाइन तपासण्यासाठी, एखाद्याला ईपीएफ पासबुक पोर्टलला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे लागेल. यामध्ये, पासबुक डाउनलोड / पहा वर क्लिक करा. यानंतर पासबुक तुमच्या समोर उघडेल. यामध्ये तुम्ही शिल्लक स्थिती पाहू शकता.

Umang अॅपच्या मदतीने तपासा

स्मार्टफोन वापरकर्ते Umang या अॅपद्वारे त्यांचे पीएफ शिल्लक देखील तपासू शकतात. यासाठी तुम्हाला उमंग अॅप ओपन करुन ईपीएफओवर क्लिक करावे लागेल. यामध्ये Employee Centric Services वर क्लिक केल्यानंतर View Passbook वर जा आणि UAN आणि पासवर्ड टाका. हे केल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हे प्रविष्ट केल्यानंतर आपण शिल्लक पाहू शकता.

First published:

Tags: Epfo news, Money, PF Amount