मुंबई, 18 मार्च : आपल्या देशात कष्टकऱ्यांची संख्या मोठी आहे. खूप मेहनत करून यश मिळवणारे अनेक जण आपल्याला पाहायला मिळतात. लहान-मोठ्या सर्वच शहरांमध्ये अनेक जण उदरनिर्वाह करण्यासाठी आणि आपली आवड जपण्यासाठी काम करतात. बेंगळुरू शहरही याला अपवाद नाही. भारताची टेक कॅपिटल अशी ओळख असलेल्या या शहरात अनेक उद्योजक आहेत. अगदी चहावाल्यापासून ते रिक्षावाल्यापर्यंत प्रत्येक जण स्वप्न पाहतो आणि आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतो. अशा एका यू-ट्यूबर रिक्षावाल्याची गोष्ट जाणून घेऊ या.
जनार्दन नावाचा एक ऑटो चालक अनेकांना प्रेरणा देतो. सुशांत कोशी नावाच्या एका युझरने त्याच्या संदर्भात ट्विट्स केली आहेत. त्यामध्ये जनार्दनच्या रिक्षाचा फोटो आहे. "प्लीज माझ्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा, गोल्ड जनार्दन इनव्हेस्टर. प्लीज सबस्क्राइब करून सपोर्ट करा" असं त्यात लिहिलेलं दिसतंय. हे पाहून सुशांत खूप आश्चर्यचकित झाला. "आज मला भेटलेला उबर ऑटो ड्रायव्हर एक यू-ट्यूब इन्फ्लुएन्सर आहे. तो पर्सनल फायनान्स या विषयात तज्ज्ञ आहे," अशी कॅप्शन त्याने दिली आहे.
बँकेकडून महत्त्वाचा अलर्ट! C-KYC केलं नाही तर बंद होणार अकाउंट, तुम्ही केलं का?
बरेच जण यू-ट्यूब चॅनेल सुरू करतात आणि आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करतात. ते त्यांना उत्तमरीत्या येत असलेले विषय हाताळतात. सुशांत कोशीला जनार्दनचं यू-ट्यूब अकाउंट शोधल्यावर आनंद झाला. त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज होते. “मध्यवर्ती बँका अगदी सहज नोटा का छापू शकत नाहीत, यावर जनार्दनने दिलेली माहिती खूपच प्रभावी आहे,” असं सुशांतने ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
सुशांतने ट्वीटद्वारे जनार्दनचं यू-ट्यूब चॅनेल प्रमोट केलं आणि माणुसकी अजून जिवंत आहे, हे सिद्ध केलं. युझर्सनी जनार्दनचं यू-ट्यूब चॅनेल सबस्क्राइब का करावं, याची कारणंही त्याने दिली. “ऑटोड्रायव्हर जनार्दनच्या यू-ट्यूब चॅनेलवर गेलो आणि मी खूप प्रभावित झालो. तो क्लिष्ट आर्थिक विषय सोप्या भाषेत सांगतो. तो सामान्य माणसाच्या शब्दांत ते समजावून सांगतो आणि त्याने ग्राफिक्स व इतर गोष्टींचा वापर करून व्हिडिओ तयार केले आहेत,” असं सुशांतने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Youtube