ATM मधून पैसे काढताना या लाइटवर ठेवा लक्ष, नाहीतर रिकामं होईल तुमचं बँक खातं

ATM मधून पैसे काढताना या लाइटवर ठेवा लक्ष, नाहीतर रिकामं होईल तुमचं बँक खातं

ATM मधून पैसे काढणं हे तसं नेहमीचंच पण अशा वेळी खबरदारी घेतली नाही तर तुमचं बँक खातं रिकामं होण्याचा धोका आहे. ऑनलाइन फ्रॉडच्या शक्यतेमुळे तर जास्तच सावध राहावं लागतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जानेवारी : ATM मधून पैसे काढणं हे तसं नेहमीचंच पण अशा वेळी खबरदारी घेतली नाही तर तुमचं बँक खातं रिकामं होण्याचा धोका आहे. ऑनलाइन फ्रॉडच्या शक्यतेमुळे तर जास्तच सावध राहावं लागतं. ATM मध्ये सगळ्यात जास्त धोका कार्ड क्लोनिंगमुळे निर्माण होतो.तुमच्या कार्डमधून पूर्ण माहिती चोरून तुमचं दुसरं कार्ड बनवणं याला कार्ड क्लोनिंग म्हणतात.

अशी होते माहितीची चोरी

ATM मध्ये घातलेल्या कार्डवरून हॅकर कोणत्याही युडरचा डेटा चोरू शकतो. हे लोक ATM च्या कार्ड स्लॉटमध्ये असं एक डिव्हिइस लावतात की जे तुमच्या कार्डची सगळी माहिती स्कॅन करू शकतात. यानंतर ब्लू टूथ किंवा दुसरं वायरलेस डिव्हाइसमधून तुमचा डेटा चोरला जातो.

या गोष्टी लक्षात ठेवा

1. तुमच्या डेबिट कार्डचा पूर्ण अॅक्सेस घेण्यासाठई हॅकर्स तुमचा PIN नंबर चोरतात. हा पिन नंबर कोणत्याही कॅमेऱ्याने ट्रॅक करता येतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमचा PIN नंबर एंटर करता तेव्हा दुसऱ्या हाताने तो लपवा. म्हणजे तो CCTV कॅमेऱ्यात स्कॅन होणार नाही.

(हेही वाचा : SBI च्या 42 कोटी ग्राहकांना धक्का, FD वरचे व्याजदर घटवले)

2. तुम्ही ATM सेंटरमध्ये गेल्यावर ATM मशिनच्या कार्ड स्लॉटवर लक्ष द्या. कार्ड स्लॉटमध्ये काही गडबड आढळली तर त्याचा वापर करणं टाळा.

3. कार्ड स्लॉटमध्ये कार्ड घालताना त्यात लागणाऱ्या लाइटवर लक्ष द्या. स्लॉटमध्ये हिरवा दिवा असेल तर ATM सुरक्षित आहे. पण त्यामध्ये लाल किंवा कुठलाही दिवा लागला नसेल तर ATM चा वापर टाळा. त्यामध्ये काही गडबड असू शकते.

4. तुम्ही जर हॅकर्सच्या जाळ्यात फसलात आणि बँकही बंद असेल तर लगेच पोलिसांशी संपर्क करा. त्याचबरोबर आसपास एखाद्याचं ब्लू टूथ कनेक्शन अॅक्टिव्ह असेल तर त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही लगेच पोहोचू शकता.

=================================================================================================

First published: January 14, 2020, 4:17 PM IST
Tags: ATMmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading