Home /News /money /

Atal Pension Yojana : महिन्याला 210 रुपये भरा, उतारवयात मिळणार 'इतकं' पेन्शन

Atal Pension Yojana : महिन्याला 210 रुपये भरा, उतारवयात मिळणार 'इतकं' पेन्शन

सरकारने नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना खूप कमी गुंतवणूक (Investment) करून दरमहा पेन्शनची चांगली रक्कम हातात पडू शकते.

    मुंबई, 24 जून : निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहावं लागू नये, यासाठी अनेक निवृत्तीवेतन अर्थात पेन्शन योजना उपलब्ध आहेत. त्यासाठी कमी वयात गुंतवणूक सुरू केली, तर अधिक फायदा मिळू शकतो. सरकारने नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना खूप कमी गुंतवणूक (Investment) करून दरमहा पेन्शनची चांगली रक्कम हातात पडू शकते. या योजनेविषयी जाणून घेऊ या. अटल पेन्शन योजना ही सरकारी पेन्शन (Government Pension Plan) योजना आहे. यात दरमहा 1 हजार, 2 हजार, 3 हजार, 4 हजार ते जास्तीत जास्त 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकतं. ही योजना सुरक्षित असून, वयाची 60 वर्षं पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराला पेन्शन सुरू होतं. महिन्याला पाच हजार रुपये (Five Thousand Monthly Pension) असं वर्षाला एकूण 60 हजार रुपयांचं पेन्शन आजीवन मिळू शकतं. पती-पत्नी दोघांनीही गुंतवणूक केली, तर वर्षाला एकूण एक लाख 20 हजार रुपये पेन्शन ते मिळवू शकतात. या योजनेत 18 ते 40 वयोगटातला कोणीही भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो. वयाच्या साठीनंतर दरमहा किती पेन्शन आपल्याला हवं आहे, यावर आपल्याला किती गुंतवणूक करावी लागणार हे अवलंबून आहे. 5 हजार रुपयांच्या पेन्शनसाठी वयाच्या 18व्या वर्षापासूनच गुंतवणूक केली, तर महिन्याला केवळ 210 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल. त्या हिशेबाने तीन महिन्यांच्या इन्स्टॉलमेंटसाठी 626 रुपये, तर सहा महिन्यांच्या हप्त्यासाठी 1239 रुपये भरावे लागतील. एक हजार रुपयांची पेन्शन योजना निवडली, तर महिन्याला केवळ 42 रुपयेच भरावे लागतील. नवरा व बायको अशा दोघांनीही ही गुंतवणूक केली असेल, तर त्यांना साहजिकच दुहेरी पेन्शन मिळू शकतं. (तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिताना घ्या 'ही' काळजी; खूप जास्त प्रमाणात प्यायल्यास 'हा' धोका) या योजनेचा पाच हजार रुपयांचा पेन्शन प्लॅन 35 वर्षांच्या व्यक्तीने घेतला, तर पुढची 25 वर्षं दर सहा महिन्यांनी 5323 रुपये गुंतवावे लागतील. या परिस्थितीत तुम्ही एकूण 2.66 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. त्यावर तुम्हाला साठ वर्षांनी पाच हजार रुपयांचं पेन्शन दरमहा मिळेल. हीच गुंतवणूक 18व्या वर्षीच सुरू केली, तर केवळ 1.04 लाखांची गुंतवणूक करूनही दरमहा 5000 रुपयांचं पेन्शन तुम्ही मिळवू शकता. अटल पेन्शन योजनेविषयी.. - हप्ता भरण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध. मासिक, तिमाही किंवा सहामाही गुंतवणूक करू शकता. - या योजनेत गुंतवणूक केल्यास दीड लाख रुपयांपर्यंतची करसवलत मिळते. - एका व्यक्तीच्या नावावर एकच खातं उघडता येतं. - साठ वर्षांच्या आधी किंवा नंतर गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास, पेन्शनची रक्कम जोडीदाराला मिळते. - नवरा व बायको दोघांचाही मृत्यू झाल्यास, ही रक्कम नॉमिनी असलेल्या व्यक्तीला मिळते. - कमीतकमी पैसे भरून कोणीही नागरिक अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतो. कमी वयात योजना सुरू केल्यास कमी गुंतवणुकीत अधिक लाभ घेता येऊ शकेल.
    First published:

    Tags: Pension, Pension scheme

    पुढील बातम्या