Home /News /lifestyle /

तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिताना घ्या 'ही' काळजी; खूप जास्त प्रमाणात प्यायल्यास 'हा' धोका

तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिताना घ्या 'ही' काळजी; खूप जास्त प्रमाणात प्यायल्यास 'हा' धोका

पाणी कशातून प्यावं किंवा साठवावं, याचेही काही नियम आहेत. त्यासाठी तांब्याची भांडी (Copper Vessels) उत्तम असतात, असं सांगितलं जातं.

    मुंबई, 23 जून : पाणी ही शरीरासाठी अत्यावश्यक गोष्ट असते. दिवसातून किती लिटर पाणी प्यावं, कसं पाणी प्यावं, याबाबत तज्ज्ञ वेळोवेळी सांगत असतात. पाणी कशातून प्यावं किंवा साठवावं, याचेही काही नियम आहेत. त्यासाठी तांब्याची भांडी (Copper Vessels) उत्तम असतात, असं सांगितलं जातं. तांब्याच्या भांड्यात साठवलेलं पाणी प्यायल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतो असं म्हणतात. हे सगळं खरं असलं, तरी तांब्याच्या भांड्यातलं पाणी जास्त प्रमाणात पिणं शरीराला (Drinking Water In Copper Vassals Can Be Harmful?) अपायकारकही ठरू शकतं. मग हे पाणी कशा पद्धतीनं प्यावं, याचे नियम जाणून घेतले पाहिजेत. 'टीव्ही 9 हिंदी'ने त्याबाबत माहिती देणारं सविस्तर वृत्त दिलं आहे. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे, तांब्याच्या भांड्यात रात्रभर साठवलेलं पाणी (Drink Water In Morning) सकाळी प्यावं. हे पाणी सकाळी प्यायल्यानं शरीराला त्याचे चांगले फायदे मिळतात; मात्र झोपताना रात्रीच्या वेळी हे पाणी प्यायलं किंवा जेवणानंतर हे पाणी प्यायलं, तर त्यामुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं. तांब्याच्या भांड्यात पाणी साठविताना आणखी एक काळजी घेतली पाहिजे. पाणी ठेवलेलं भांडं खाली जमिनीवर ठेवू नये. तसं केल्यानं तांब्याची शुद्धता कमी होते. त्यामुळे हे भांडं एखाद्या लाकडी पृष्ठभागावर ठेवावं. यामुळे तांब्याचे संपूर्ण गुणधर्म पाण्यात उतरतील व ते पाणी आरोग्याला फायदेशीर ठरेल. ('कोणाला घाबरवताय? तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही', एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट) कधीकधी चांगलं खाण्यापिण्याच्या सवयी लावून घेताना ते किती खावं किंवा प्यावं याकडे आपण दुर्लक्ष करतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. हेच तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याबाबत म्हणता येईल. तब्येतीसाठी चांगलं असलं, तरी ते मर्यादित प्रमाणातच प्यायलं पाहिजे. तांब्याच्या भांड्यातलं पाणी दिवसातून दोन लीटरपेक्षा जास्त प्रमाणात प्यायल्यास आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. पोटात दुखणं, गॅसेस, अ‍ॅसिडिटी होऊ शकते. असं वारंवार केल्यास शरीरात तांब्याचं प्रमाण वाढतं. ते यकृतासाठी चांगलं नसतं. त्यामुळे यकृताचं कार्य (Liver Functioning) बिघडू शकतं. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातलं पाणी मर्यादित स्वरूपातच प्यावं. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्यामुळे आणखीही काही फायदे होतात. कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी, थायरॉइड ग्रंथींचं कार्य व्यवस्थित राहण्यासाठी, पचनासाठी, आर्थ्रायटिस बरा करण्यासाठी तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं उपयुक्त ठरू शकतं. तांब्याच्या भांड्यांमध्ये आता खूप प्रकारही उपलब्ध असतात. तांब्या, भांडं, कळशी, हंडा, छोटं पिंप, तसंच तांब्याची बाटलीही आता मिळते; मात्र त्याचा वापर करताना त्याचा अतिरेक होणार नाही हे पाहिलं पाहिजे. तसंच सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी हे पाणी पिणं आरोग्यासाठी अधिक चांगलं असतं, असं म्हटलं जातं.
    First published:

    पुढील बातम्या