दररोज 7 रुपयांची बचत करून मिळवा 60,000 रुपये पेन्शन, सरकारने बदलले या योजनेचे नियम

दररोज 7 रुपयांची बचत करून मिळवा 60,000 रुपये पेन्शन, सरकारने बदलले या योजनेचे नियम

मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असणारी अटल पेन्शन योजना, या योजनेमध्ये दररोज 7 रुपये बचत करून 60 वर्षानंतर दर महिन्याला 5000 रुपये अर्थात वार्षिक 60 हजरांची पेन्शन मिळवू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 जुलै : मोदी सरकारची (Modi Government) महत्त्वाकांक्षी योजना असणारी अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana APY), या योजनेमध्ये दररोज 7 रुपये बचत करून 60 वर्षानंतर दर महिन्याला 5000 रुपये अर्थात वार्षिक 60 हजरांची पेन्शन मिळवू शकता. दरम्यान या योजनेबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार आता खातेधारक सर्व बँकांशी वर्षभरात कधीही पेन्शन कॉन्ट्रिब्‍यूशनची रक्कम कमी जास्त करण्यास सांगू शकतात. 1 जुलैपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. याआधी केवळ खातेधारकांना एप्रिलमध्येच योगदानाची रक्कम बदलता येत असे.

दरम्यान पीएफआरडीए नुसार मेंबर केवळ एकदाच पेन्शन योजनेमध्ये बदल करू शकतात. अटल पेन्शन योजनेअंतर्गत जवळपास 2.28 कोटी नागरिकांनी नोंदणी केली आहे. पीएफआरडीएने ही देखील माहिती दिली आहे की, 1 जुलै 2020 पासून APY साठी संबंधित खातेधारकाच्या खात्यातून थेट रक्कम कापली जात आहे.

(हे वाचा-आनंदाची बातमी! 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या तारखेला येणार 2000 रुपये)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) 30 जूनपर्यंत योगदान रक्कम जमा करण्यासंदर्भात सूट दिली होती. सद्य प्रणालीनुसार, एपीवाय योगदान एप्रिल ते ऑगस्ट 2020 दरम्यान प्रलंबित आहे, ते 30 सप्टेंबरपर्यंत भागधारकांच्या बचत खात्यांमधून आपोआप वजा केले जाईल. त्यासाठी दंड म्हणून कोणतेही व्याज देय आकारले जाणार नाही.

अटल पेन्शन योजना मे 2015 पासून सुरू झाली आहे. ही योजना 18 ते 40 वयोगटातील कोणत्याही व्यक्तीसाठीखुली आहे. या योजनेअंतर्गत संबंधित व्यक्ती 60 वर्षांची झाल्यानंतर 1000 ते 5000 रुपयांचे गॅरंटिड पेन्शन मिळते.

योजनेस कोण आहे पात्र?

नॅशनल सिक्योरिटीज डिपोझिटरी (NSDL) च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ इनकम टॅक्स स्लॅबच्या बाहेर असणाऱ्या व्यक्तीच घेऊ शकतात. जे व्यक्ती आयकर प्रणालीअंतर्गत येतात (Income Tax) किंवा जे सरकारी कर्मचारी आहेत किंवा EPF, EPS या योजनांचा लाभ घेत ते अटल पेंशन योजनेचा (APY) का हिस्सा नाही बनू शकत.

दररोज 7 रुपयाच्या गुंतवणुकीतून मिळेल 5 हजार रुपयांचे पेन्शन

या खात्यामध्ये 60 वयवर्ष होईपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. 60 वर्ष वय झाल्यानंतर संबधित व्यक्तील दर महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन मिळण्यास सुरूवात होईल. जर 18 वयवर्षापासून एखाद्या व्यक्तीने गुंतवणूक करण्यास सुरूवात केल्यास दर महिन्याला तीला 210 रुपये या योजनेसाठी द्यावे लागतील, तर तो साठाव्या वर्षापासून 5 हजार रुपये पेन्शन मिळवू शकेल.

(हे वाचा-उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फ्री LPG सिलेंडर,मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय)

वयाच्या अठराव्या वर्षापासूनच्या या गुंतवणुकीचं गणित केल्यास संबधित व्यक्तीला केवळ 7 रुपये प्रति दिन इतकी गुंतवणूक करायची आहे. तर वयाच्या साठाव्या वर्षी वार्षिक 60 हजार रुपयांची रक्कम तुम्हाला मिळेल.

25 वयापासून दर महिन्याला किती कराल गुंतवणूक?

25 वर्ष वय असणारी व्यक्ती या योजनेमध्ये जर गुंतवणूक करू इच्छित असेल तर तर प्रति महिना त्याला केवळ 376 रुपये एवढी गुंतवणूक करावी लागेल. याप्रकारे वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून त्याने 376 रुपये प्रति महा जमा केल्यास 60 वर्ष वयानंतर त्याला दर महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन मिळेल.

कुठे उघडाल या योजनेसाठी खाते?

कोणत्याही सरकारी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेसाठी खाते उघडता येईल. एका व्यक्तीला एकच अटल पेन्शन योजना खाते उघडण्याची मुभा आहे. या योजनेमध्ये पेन्शनरच्या मृत्यूनंतर पती/पत्नी याचा लाभ घेऊ शकतात अशी सुविधा आहे. मुलांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. विशेष म्हणजे इनकम टॅक्स कायदा (Income Tax Act.) सेक्शन 80C अंतर्गत या या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर टॅक्समध्ये सूट देखील मिळेल.

अटल पेंशन योजनेबाबत (APY) अधिक माहितीसाठी तुम्ही या वेबसाइटवर जाऊ शकता- https://npscra.nsdl.co.in/nsdl/scheme-details/APY_Scheme_Details.pdf

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 9, 2020, 11:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading