Home /News /money /

Government Scheme: सरकारकडून पती-पत्नी दोघांना मिळतोय 10 हजारांचा लाभ; 'या' योजनेचा फायदा घ्या

Government Scheme: सरकारकडून पती-पत्नी दोघांना मिळतोय 10 हजारांचा लाभ; 'या' योजनेचा फायदा घ्या

Government Pension Scheme: अटल पेन्शन योजनेत तुम्हाला एक हजार, दोन हजार, तीन हजार, चार हजार आणि जास्तीत जास्त पाच हजार रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल.

मुंबई, 16 मे : देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या (Citizen) सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील असतं. त्यासाठी वेळोवेळी विविध कल्याणकारी योजना (Welfare Scheme) राबवल्या जातात. अगदी लहान बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या भवितव्याचा अशा योजनांमध्ये विचार केला जातो. तसं पाहिलं तर ज्येष्ठ नागरिक हे सक्रिय लोकसंख्येमध्ये सहभागी नसतात. देशाच्या विकासामध्ये त्यांचा फारसा प्रत्यक्ष सहभाग नसतो. असं असलं, तरी सरकार आपल्या देशातल्या ज्येष्ठ नागरिकांचा वृद्धापकाळ चांगला जावा यासाठी प्रयत्नशील असतं. भारत सरकारनं देशातल्या नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) सुरू केली आहे. या सरकारी योजनेत गुंतवणूक करून तुम्ही मासिक पेन्शन (Monthly Pension) मिळवू शकता. दिवंगत भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांनी 2015 मध्ये ही योजना सुरू केली आहे. असंघटित कुटुंबांना भक्कम आर्थिक साह्य देण्याच्या उद्देशानं ही योजना सुरू केली आहे. या योजनेत पती-पत्नीला मिळून दहा हजार रुपयांपर्यंतच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकतो. टाइम्स बुल डॉट कॉमने याबाबत माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अटल पेन्शन योजनेची सुरुवात 2015 मध्ये झाली. असंघटित क्षेत्रात (Unorganized Sector) काम करणाऱ्या कामगारांच्या वृद्धापकाळाचा (Old Age) विचार करून ही योजना सुरू करण्यात आली होती. पण, आता भारतात राहणारी 18 ते 40 वर्षं वयोगटातली कोणीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक (Investment) करू शकते, जेणेकरून वयाच्या साठीनंतर संबंधित व्यक्तीला दर महिन्याला पेन्शनचा लाभ मिळेल. एखाद्या व्यक्तीनं वयाच्या 18 व्या वर्षी ही योजना सुरू केली तर वयाच्या 60 वर्षांनंतर तिला पाच हजार रुपये मासिक पेन्शन मिळवता येऊ शकतं. त्यासाठी दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील. Investment Tips: तीन वर्षाच्या मुलाच्या नावे PPF खातं सुरु करा; 15 वर्षात 32 लाख जमा होतील विशेष म्हणजे या योजनेत टॅक्स सूटदेखील उपलब्ध आहे. इनकम टॅक्स कायदा 80Cनुसार, अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंतचा टॅक्स बेनिफिट (Tax Benefit) मिळतो. काही केसेसमध्ये, 50 हजार रुपयांपर्यंतचा एक्स्ट्रा टॅक्स बेनिफट मिळतो. म्हणजेच तुम्हाला एकूण दोन लाख रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. याशिवाय, एखाद्या व्यक्तीचा वयाच्या 60 व्या वर्षापूर्वी मृत्यू झाला तर त्याची पत्नी किंवा पती ही योजना सुरू ठेवू शकतात आणि पेन्शनचा लाभ मिळवू शकतात. याशिवाय पतीच्या मृत्यूनंतर पत्नी एकरकमी रकमेवर दावा करू शकते. पत्नीचाही मृत्यू झाल्यास तिच्या नॉमिनीला एकरकमी रक्कम मिळते. LIC चे स्वस्तात शेअर खरेदीची संधी, कसं? तज्ज्ञांकडून समजून घ्या अटल पेन्शन योजनेत तुम्हाला एक हजार, दोन हजार, तीन हजार, चार हजार आणि जास्तीत जास्त पाच हजार रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशनसाठी, तुमच्याकडे सेव्हिंग्ज अकाउंट, आधार नंबर आणि मोबाइल नंबर असणं गरजेचं आहे. खालील पद्धतीनं तुम्ही अटल पेन्शन योजनेचा फॉर्म डाउनलोड करू शकता : >> तुम्ही जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेतून फॉर्म मिळवू शकता. >> या योजनेत सहभागी बँकांच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही फॉर्मची प्रिंट आउट डाउनलोड करू शकता. >> पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या (Pension Fund Regulatory and Development Authority) अधिकृत वेबसाइटवरूनदेखील अटल पेन्शन योजनेत खाते उघडण्याचा फॉर्म डाउनलोड करता येतो. >> अटल पेन्शन योजनेचा फॉर्म हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, मराठी, बांगला, ओडिया, तमिळ आणि तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. 2015 पासून देशातल्या अनेक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे.
First published:

Tags: Investment, Money, Pension

पुढील बातम्या