Home /News /money /

काय सांगता! 99,999 रुपयांना विकला एक किलो चहा, कारण ऐकून व्हाल थक्क

काय सांगता! 99,999 रुपयांना विकला एक किलो चहा, कारण ऐकून व्हाल थक्क

एक किलो चहासाठी तब्बल 99 हजार 999 रुपयांची बोली लागली आहे. हा आतापर्यंतचा विक्रम आहे.

    गुवाहाटी, 14 डिसेंबर: एक किलो चहाची (One kg tea) तब्बल 99 हजार 999 रुपयांना विक्री (Sold) झाली असून आतापर्यत चहाला मिळालेला हा सर्वाधिक दर (Highest rate so far) असल्याचा विक्रमही नोंदवला गेला आहे. हे ऐकून कुणालाही प्रश्न पडेल की या चहात असं काय आहे, ज्याला एवढा लाखांचा भाव यावा. आसाममध्ये दरवर्षी चहाच्या दराची बोली लागते. त्यात चहाच्या काही दुर्मिळ आणि मौल्यवान ब्रॅँडना बाजारात मोठी मागणी असते. हीच मागणी लक्षात घेऊन यंदादेखील चहाची बोली लावण्यात आली आणि गोल्डन बटरफ्लाय चहाला तब्बल 99 हजार 999 रुपयांचा भाव मिळाला. मनोहारी गोल्ड चहा चहाच्या ज्या पानांना एवढी भलीमोठी बोली लावण्यात आली, तो चहा बाजारात मनोहारी गोल्ड चहा या नावाने विकला जातो. या चहानं मंगळवारी गुवाहाटीत सगळे जुने विक्रम तोडत नवा विक्रम रचला आणि एक लाखांपेक्षा केवळ एक रुपया कमीचा भाव मिळवला. दिब्रुगढ जिल्ह्यात पिकणारा हा चहा गुवाहाटीचे प्रसिद्ध व्यापारी सौरभ टी ट्रेडर्स यांनी खरेदी केला. त्यांनीच या चहासाठी सर्वाधिक 99,999 रुपयांची बोली लावली असल्यामुळे ते या बोलीचे विजेत ठरले. काय आहे वैशिष्ट्य मनोहारी गोल्ड चहाचं उत्पादन आसामच्या दिब्रुगढ जिल्ह्यात केलं जातं. GATC नं दिलेल्या माहितीनुसार या जातीच्या चहाच्या पानांना भारतात सर्वाधिक मागणी असल्यामुळे त्याला सर्वोच्च किंमत नेहमीच मिळते. गेल्या वर्षी हा चहा 75 हजार रुपये किलो दराने विकला गेला होता. यंदाही त्यांनीच सर्वोच्च बोली लावून हा चहा मिळवला आहे. हे वाचा- जास्त वेळ एकाच जागी बसल्यानं रक्तप्रवाहावर होतो हा परिणाम;या आजारांचा वाढतो धोका असा झाला सौदा हा चहा ज्यांच्या मळ्यात पिकतो, त्यांच्याकडून आम्ही थेट खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी आम्हाला तो विकण्यास नकार दिला. या प्रकारच्या चहाचं उत्पादन कमी असल्यामुळे आम्हाला तो काहीही करून विकत घ्यायचा होता, अशी प्रतिक्रिया सौरभ टी ट्रेडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एल. माहेश्वरी यांनी माध्यमांना दिली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Price, Record, Tea

    पुढील बातम्या