मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /जास्त वेळ एकाच जागी बसल्यानं रक्तप्रवाहावर होतो हा भयंकर परिणाम; या आजारांचा वाढतो धोका

जास्त वेळ एकाच जागी बसल्यानं रक्तप्रवाहावर होतो हा भयंकर परिणाम; या आजारांचा वाढतो धोका

Blood Circulation Blocked : कमी अंतर चालण्यासाठीही लोक कार किंवा बाइकचा वापर करतात. चालल्यामुळे शरीर क्रियाशील राहून रक्ताभिसरण चांगले राहते. चांगल्या रक्ताभिसरणानेच ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो.

Blood Circulation Blocked : कमी अंतर चालण्यासाठीही लोक कार किंवा बाइकचा वापर करतात. चालल्यामुळे शरीर क्रियाशील राहून रक्ताभिसरण चांगले राहते. चांगल्या रक्ताभिसरणानेच ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो.

Blood Circulation Blocked : कमी अंतर चालण्यासाठीही लोक कार किंवा बाइकचा वापर करतात. चालल्यामुळे शरीर क्रियाशील राहून रक्ताभिसरण चांगले राहते. चांगल्या रक्ताभिसरणानेच ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो.

नवी दिल्ली, 14 डिसेंबर : आजच्या जीवनशैलीत कामाच्या दीर्घ तासांमध्ये (Long Working Hours) बरेच लोक त्यांच्या आरोग्याबाबत अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. अनियमित आहार आणि नियमित व्यायामाचा अभाव, यामुळे समस्या वाढतच जातात. कमी अंतर चालण्यासाठीही लोक कार किंवा बाइकचा वापर करतात. चालल्यामुळे शरीर क्रियाशील राहून रक्ताभिसरण चांगले राहते. चांगल्या रक्ताभिसरणानेच ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो. जेव्हा शरीराच्या प्रत्येक भागात पुरेसे रक्त परिसंचरण होत नाही, तेव्हा हात आणि पाय थंड होऊ लागतात किंवा बधीर होतात. जर तुमची त्वचा नाजूक असेल तर पायांचा रंग निळा होऊ शकतो. खराब रक्ताभिसरणामुळे त्वचा कोरडी होऊ शकते, नखे आपोआप तुटू लागतात तसेच केस गळण्याचे (Blood Circulation Blocked) प्रमाण वाढते.

दैनिक भास्कर वृत्तपत्राच्या बातमीत रक्त प्रवाह (Blood Circulation) मंदावण्याची अनेक कारणे सविस्तरपणे सांगितली आहेत. या वृत्तानुसार, जास्त वेळ बसणे, उच्च रक्तदाब, धूम्रपानाची सवय, सकस आहार न घेणे आणि व्यायामाचा अभाव ही रक्तप्रवाह मंदावण्याची प्रमुख कारणे नमूद करण्यात आली आहेत.

जास्त काळ बसणे

PubMed, gov च्या मते, बसलेले किंवा झोपलेले असताना पायांच्या स्नायूंमध्ये रक्त प्रवाह 90 टक्क्यांपर्यंत कमी होतो. जास्त वेळ बसल्याने रक्त गोठण्याचा धोका वाढतो. अशा स्थितीत 30 मिनिटे बसल्यानंतर 3 मिनिटांचा ब्रेक हवा.

हे वाचा - Iron for Health: आपल्या शरीराला दररोज किती लोह आवश्यक असतं, योग्य प्रमाण जाणून घ्या

उच्च रक्तदाब

हेल्थलाइनच्या माहितीनुसार, उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या कडक होण्याचा धोका असतो, त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.

धूम्रपान सोडणे

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या मते, सिगारेट आणि तंबाखूमध्ये निकोटीन हा विषारी घटक असतो. यामुळे धमनीच्या भिंतींना नुकसान होते, रक्त घट्ट होते. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.

हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

पालेभाज्या आणि वोक

पालकसारख्या पालेभाज्यांमध्ये नायट्रेट्स असतात, ज्याचे शरीर नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित करते. यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. त्याचप्रमाणे ताशी किमान 5 किलोमीटर वेगाने चालणे रक्तप्रवाहासाठी खूप फायदेशीर आहे.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips