जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Multibagger Share: गुंतवणूकदार 'या' शेअरमुळे मालामाल, 1 लाख रुपये बनले 28 कोटी

Multibagger Share: गुंतवणूकदार 'या' शेअरमुळे मालामाल, 1 लाख रुपये बनले 28 कोटी

Multibagger Share: गुंतवणूकदार 'या' शेअरमुळे मालामाल, 1 लाख रुपये बनले 28 कोटी

अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेसची मार्केट कॅप 1147 कोटी रुपये आहे. अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअर्सची 52 आठवड्यांतील हाय लेव्हल 1387.75 रुपये आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई 20 जुलै : शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूक ही जोखमीची असते. पण हल्ली ही जोखीम घेऊन शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचं प्रमाण वाढत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स चांगले रिटर्न्स (Returns) देत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला फायदा होतोय. या आठवड्यातही एका नॉन बँकिंग फायनान्स कंपनीने (Non-Banking Finance Company) चांगले रिटर्न्स दिले आहेत. ज्यांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती ते मालामाल झाले. अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या (Armaan Financial Services Limited) एक शेअरची किंमत 48 पैशांवरून 1300 रुपयांपर्यंत वाढली आहे. अवघ्या काही वर्षांत अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्‍या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 200000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेसची मार्केट कॅप 1147 कोटी रुपये आहे. अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअर्सची 52 आठवड्यांतील हाय लेव्हल 1387.75 रुपये आहे, तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांतील लो लेव्हल 603.95 रुपये आहे. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय. Online Tax Filing App: ऑनलाइन रिटर्न भरताना होणारा त्रास संपणार, टाटाच्या ‘या’ अ‍ॅपमध्ये आहेत उत्तम सुविधा NBFC कंपनी अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे शेअर्स 11 मार्च 2004 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 48 पैशांच्या स्तरावर होते, ते 18 जुलै 2022 रोजी बीएसईवर 1350.75 रुपयांच्या स्तरावर बंद झाले. जर एखाद्या गुंतवणुकदाराने 11 मार्च 2004 रोजी अरमान फायनॅन्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक आजपर्यंत ठेवली असती, तर आज त्याचे एक लाख रुपये तब्बल 28.14 कोटी रुपये झाले असते. PM Kisan योजनेचा लाभ घेताना चुकीची माहिती देऊ नका, शिक्षेसह आर्थिक फटका बसू शकतो आता 10 वर्षांच्या रिटर्नबद्दल बोलायचं झाल्यास अरमान फायनॅन्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे शेअर्स 20 जुलै 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 25.70 रुपयांवर ट्रेड करत होते. आता अशा परिस्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर आता ही रक्कम 52.55 लाख रुपये झाली असती. खरं तर, 18 जुलै 2022 रोजी बीएसई 1350.75 रुपयांच्या स्तरावर बंद झाला आहे. अरमान फायनॅन्शिअलच्या शेअर्सनी गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना 36% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे, तर कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 6 महिन्यांत 71% रिटर्न दिले आहेत. काही गुंतवणूकदार असतात जे एकाच शेअर्समध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतात, तर काही जण नेहमी शेअर्स बदलत असतात. आता जर एखाद्याने अरमान फायनॅन्शिअलच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून ती तशीच ठेवली असेल, तर तो मालामाल झाला असेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात