मुंबई, 3 जानेवारी : अरिहंत कॅपिटल मार्केट्सच्या (Arihant Capital Markets) शेअरने जवळपास वर्षभराच्या स्थिर हालचालीनंतर मोठी झेप घेतली आहे. एका दिवसात हा शेअर 199 रुपयांवरून 236 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे. आज या स्टॉकमध्ये सुमारे 20 टक्के म्हणजेच सुमारे 40 रुपयांची वाढ झाली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने (Share Market Investors) आज सकाळी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला काही तासांत 18,000 रुपये नफा झाला असता. अरिहंत कॅपिटल मार्केट्सच्या शेअरनी त्यांच्या 49 महिन्यांच्या कप आणि हँडल पॅटर्नचा ब्रेकआउट केला. शेअर आज 236 रुपयांवर पोहोचला, जो 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. स्टॉकने 130-135 पातळीच्या आसपास बेस तयार केला आहे आणि तेथून चांगले पुनरागमन केले आहे. बाजारात तेजीचा कल असून, हा शेअर आणखी वर जाण्याचा संकेत आहे. बाजारातील जाणकारांच्या मते, हा स्टॉक दीर्घ मुदतीसाठी (Long Term) 300 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. घरगुती सिलेंडरवर लिहिलेल्या नंबर्समध्ये दडलंय मोठं सिक्रेट, अर्थ समजून घ्या नक्कीच फायदा होईल एका वर्षात उत्तम परतावा गेल्या एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे 160 टक्के परतावा दिला आहे आणि गेल्या एका महिन्याच्या अल्पावधीत त्याच्या मूल्यात 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अरिहंत कॅपिटलचा व्यवसाय अरिहंत कॅपिटल मार्केट्स लिमिटेड ही देशातील अग्रगण्य वित्तीय सेवा कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी सिक्युरिटीज आणि कमोडिटीज ब्रोकिंग, आर्थिक नियोजन, डिपॉझिटरी सेवा आणि मर्चंट बँकिंग सेवांसह उत्पादने आणि सेवांची विस्तृत श्रेणी ऑफर करते. कंपन्यांच्या ग्राहकांमध्ये वैयक्तिक आणि वित्तीय संस्थांचा समावेश आहे. कंपनीचे बाजार भांडवल 410.31 कोटी रुपये आहे. Credit Card चा वापर करताना सावधान! या गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल मोठं नुकसान शेअर बाजार मजबूत 2022 च्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात भारतीय बाजाराने जोरदार सुरुवात केली आहे. दुपारी एक वाजता सेन्सेक्स 796.48 अंकांच्या किंवा 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 59,050.60 च्या पातळीवर दिसत आहे. दुसरीकडे, निफ्टी 228 अंकांच्या म्हणजेच 1.31 टक्क्यांच्या मजबूतीसह 17,582.50 च्या पातळीवर दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.