मराठी बातम्या /बातम्या /मनी /

केवळ 60 रुपयांत सुरू करा LIC ची ही पॉलिसी, मॅच्युरिटीवर मिळेल संपूर्ण प्रीमियम

केवळ 60 रुपयांत सुरू करा LIC ची ही पॉलिसी, मॅच्युरिटीवर मिळेल संपूर्ण प्रीमियम

केवळ 60 रुपयांच्या प्रीमियमवर तुम्हाला या योजनेत अकाली मृत्युचा विमा मिळतो. जर विमाधारकाचा अचानक मृत्यू झाला किंवा तो अपंग झाला तर एलआयसी त्याला आर्थिक मदत देते.

केवळ 60 रुपयांच्या प्रीमियमवर तुम्हाला या योजनेत अकाली मृत्युचा विमा मिळतो. जर विमाधारकाचा अचानक मृत्यू झाला किंवा तो अपंग झाला तर एलआयसी त्याला आर्थिक मदत देते.

केवळ 60 रुपयांच्या प्रीमियमवर तुम्हाला या योजनेत अकाली मृत्युचा विमा मिळतो. जर विमाधारकाचा अचानक मृत्यू झाला किंवा तो अपंग झाला तर एलआयसी त्याला आर्थिक मदत देते.

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : सध्याच्या काळात विमा घेणं खूप महत्त्वाचं ठरतं आहे. कुठल्या कंपनीचा विमा कव्हर घ्यावा असा प्रश्न कायमच पडत असतो. त्यातही कुठली योजना निवडावी हाही प्रश्न असतोच. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी (LIC) या सरकारी कंपनीच्या योजना घेण्याकडे अनेकांचा कल असतो. यात टर्म लाइफ इन्शुरन्स, अपघात विमा असे प्रकार असतात.

एलआयसीची न्यू जीवन मंगल (LIC Jeevan Mangal) ही एक मायक्रो इन्शुरन्स पॉलिसी आहे. या योजनेची मुदत संपल्यावर तुम्ही भरलेला संपूर्ण प्रीमियम तुम्हाला परत दिला जातो. केवळ 60 रुपयांच्या प्रीमियमवर तुम्हाला या योजनेत अकाली मृत्युचा विमा मिळतो. जर विमाधारकाचा अचानक मृत्यू झाला किंवा तो अपंग झाला तर एलआयसी त्याला आर्थिक मदत देते. विमाधारकाने रेग्युलर विमा पॉलिसी काढली असेल तर त्याच्या वारसांना त्याने भरलेल्या वार्षिक प्रीमियमच्या सात पट म्हणजे साधारण 105 टक्के रक्कम मिळते. एखाद्या विमाधारकाने सिंगल प्रीमियम भरून गुंतवणूक केली आणि दरम्यानच्या काळात त्याचा मृत्यू झाला तर त्याला विम्याच्या रकमेच्या जास्तीतजास्त 125 टक्के रक्कम मिळते.

अशी आहे पात्रता -

न्यू जीवन मंगल पॉलिसी विकत घेण्यासाठी विमाधारकाचं वय कमीतकमी 18 वर्षे असणं गरजेचं आहे. अधिकाधिक 55 वर्षांची व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकते. पॉलिसीधारक 65 वर्षांचा झाला तर त्याची पॉलिसी मॅच्युअर होईल. या पॉलिसीसाठी कमीतकमी 10 हजार रुपये आणि जास्तीतजास्त 50 हजार रुपये सम अश्युअर्ड आहे. रेग्युलर प्रीमियम आणि सिंगल प्रीमियम अशा दोन पद्धतींनी तुम्ही ही पॉलिसी खरेदी करू शकता. समजा एखाद्याने 20 हजार रुपयांची सम अश्युअर्ड पॉलिसी 10 वर्षांसाठी खरेदी केली तर त्याला दरवर्षी 1191 रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल.

खास महिलांसाठी LIC 'ही' पॉलिसी, जी देते लाखोंचा लाभ

विमाधारकाचा अचानक मृत्यु झाला तर वारसाला विम्याची रक्कमेइतकीच जादाची रक्कम दिली जाते. जर मुदत संपेपर्यंत पॉलिसीधारक जिवंत असेल तर मुदत संपल्यावर त्याला विमाची रक्कम मिळते. पण ही रक्कम मिळण्यासाठी पॉलिसी सुरू असली पाहिजे आणि तिचे हप्ते न चुकता भरले गेले पाहिजेत. या पॉलिसीत इन्कम टॅक्स 80C नुसार सवलत लागू असून प्रीमियम आणि पेमेंट हे करमुक्त आहे. ही पॉलिसी तुम्ही दरमहा 600 रुपये गुंतवून खरेदी करू शकता.

कोणत्याही कारणांमुळे जर ही पॉलिसी बंद पडली तर तुम्ही ती पुन्हा सुरू करू शकता. तुम्ही भरलेल्या शेवटच्या प्रीमियच्या हप्त्याच्या तारखेनंतरचे सगळे हफ्ते पुढच्या दोन वर्षांत भरले तर पॉलिसी सुरू होऊ शकते. एलआयसी त्यानुसार व्याज ठरवते. सिंगल प्रीमियम पॉलिसीधारक मुदतीदरम्यान कधीही ही पॉलिसी सरेंडर करू शकतात.

First published: