नवी दिल्ली 15 ऑक्टोबर : सणासुदीच्या काळातच सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. अमूलने पुन्हा एकदा दूधाचे दर वाढवले आहेत. अमूलने दिल्लीमध्ये दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे फुल क्रीम दुधाचे दर 61 रुपयांवरुन वाढून 63 रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. त्यामुळे आधीच महागाईची झळ सोसत असलेल्या सर्वसामान्यांना आता आणखी एक महागाईचा झटका बसला आहे.
पावसानं पिकांचं मोठं नुकसान, सोयाबीनचे भाव गगनाला भिडणार?
दुधाचे भाव का वाढवले? याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, कंपन्या लवकरच दुधाचे दर वाढवू शकतात, अशी भीती आधीच व्यक्त केली जात होती.
शुक्रवारी आलेल्या घाऊक महागाईच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून येतं की चाऱ्याचा महागाई दर अजूनही विक्रमी उच्चांकाच्या जवळपास आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गुरे पाळणं कठीण होत आहे. सध्या त्यांची जास्त कमाई जनावरांवर खर्च होत आहे. त्यामुळे दूध उत्पादनाचा खर्चही सातत्याने वाढत आहे. याच कारणामुळे दूधाच्या दरावरही याचा परिणाम होत आहे
महागाईत कांद्याने रडवलं! 8 रुपयांनी भाव खाल्ला आणि किलोमागे वाढला
अमूल आणि मदर डेअरी या लोकप्रिय दुधाच्या ब्रँडने खरेदी खर्चात झालेल्या वाढीची भरपाई करण्यासाठी ऑगस्टमध्येही दुधाच्या दरात 2 रुपये प्रति लिटरने वाढ केली होती. याआधी मार्चमध्येही दरात वाढ करण्यात आली होती. यापाठोपाठ आता पुन्हा एकदा अमूलने दूध दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. सणासुदीच्या अगोदर होणारी आजची दूध दरवाढ घरातील बजेटवर परिणाम करू शकते. कारण दूध हे या काळात सर्वाधिक वापरल्या जाणार्या पदार्थांपैकी एक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Price hike