जाहिरात
मराठी बातम्या / मनी / महागाईत कांद्याने रडवलं! 8 रुपयांनी भाव खाल्ला आणि किलोमागे वाढला

महागाईत कांद्याने रडवलं! 8 रुपयांनी भाव खाल्ला आणि किलोमागे वाढला

महागाईत कांद्याने रडवलं! 8 रुपयांनी भाव खाल्ला आणि किलोमागे वाढला

दिवाळीनंतरही कांद्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. नवीन कांदा येण्यासाठी अजून वेळ आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली : एकीकडे सोयाबीनचे दर घसरत आहे. तर दुसरीकडे जीवनावश्यक अनेक वस्तूंचे दर सणासुदीच्या काळात गगनाला भिडले आहेत. डाळी 5 ते 10 रुपयांनी महाग झाल्या आहेत. खाद्य तेल महाग झालं, त्यामुळे दिवाळीच्या फराळाची किंमत वाढण्याची शक्यता आहे. आता कांदा महाग व्हायला सुरुवात होत आहे. मागच्या आठवड्यात कांदा ५ रुपये किलोग्राम मागे दर वाढला होता. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. अजून नवीन कांदा काढण्यासाठी एक ते दीड महिन्याचा अवधी जाईल. मुसळधार पावसामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. सरकारने कांदा स्वस्त व्हावा म्हणून कंबर कसली आहे. सरकारने कांदा स्वस्त करण्याची तयारी केली असून राज्यांना 8 किलो दराने कांदा उपलब्ध करून दिला आहे. लासलगाव इथे कांदा १२ ते १७ रुपये किलो घाऊक बाजारात मिळत आहे. दिवाळीपर्यंत या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Soybean Prices: पावसामुळे सोयाबीनवर संकट, किंमतीही घसरल्या काय कारण

दिवाळीनंतरही कांद्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. नवीन कांदा येण्यासाठी अजून वेळ आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात सर्वात जास्त कांदा उत्पादन केलं जातं. यातील बराचसा कांदा हा पावसामुळे खराब झाला आहे. सरकारने ८ रुपये किलोने कांदा देण्यास सुरुवात केली आहे.सरकारने कांद्याचा दीड लाख टन बफर स्टॉक केला होता. त्यातील कांदा आता इतर राज्यांना देण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीपर्यंत कांद्याची स्थिती कशी असेल याकडे लक्ष असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: farmer , onion
  • First Published :
जाहिरात
जाहिरात