जाहिरात
मराठी बातम्या / मनी / विद्यार्थ्यांना शिकता-शिकता पैसे कमावण्याची संधी; घसबसल्या एक-दोन तास द्या अन् 25-30 हजार सहज कमवा

विद्यार्थ्यांना शिकता-शिकता पैसे कमावण्याची संधी; घसबसल्या एक-दोन तास द्या अन् 25-30 हजार सहज कमवा

विद्यार्थ्यांना शिकता-शिकता पैसे कमावण्याची संधी; घसबसल्या एक-दोन तास द्या अन् 25-30 हजार सहज कमवा

ऑनलाईन ट्युशन प्लॅटफॉर्म फक्त शाळा-कॉलेजपर्यंत मर्यादिल राहिलेला नाही. असे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत जे केजी पासून पदवीपर्यंत ट्युशन्स घेतातच, याशिवाय स्पर्धापरीक्षांसाठीही ऑनलाईन कोचिंग सुरु झाले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 सप्टेंबर : सध्याच्या काळात विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे. याशिवाय भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आजच्या कमाईतून नियोजन करावं लागतं. त्यामुळे आपल्या नियमित कमाई कमी पडत असल्यास अतिरिक्त मिळकतीची गरज भासते. त्यावेळी पार्ट टाईम जॉब किंवा बिजनेसचा विचार अनेकांच्या मनात येतात. मात्र नक्की करायचं काय असा प्रश्न पडतो. आज अशीच एक अतिरिक्त कमाईची संधी आहे, जी तुम्ही मिळवू शकता. तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणत्याही क्षेत्रातील असाल तरी तुम्हाला यात संधी आहे. ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा पर्याय हळूहळू वेग धरु लागला आहे. अनेक असे ऑनलाईन ट्युशन प्लॅटफॉर्म्स आहे जे मुलांना ऑनलाईन शिक्षण देतात. या सर्व प्लॅटफॉर्म्सवर चांगल्या शिक्षकांची आवश्यकता असते. खासकरुन उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे. त्यामुळे तुम्ही स्वत: शिक्षण घेत असाल तर शिकता शिकता तुम्हाला पैसे कमावता येऊ शकतात. ऑनलाईन ट्युशन प्लॅटफॉर्म फक्त शाळा-कॉलेजपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. असे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत जे केजी पासून पदवीपर्यंत ट्युशन्स घेतातच, याशिवाय स्पर्धा परीक्षांसाठीही ऑनलाईन कोचिंग सुरु झाले आहेत. यात बँकिंग, यूपीएससी, एमपीएससी यांचा समावेश आहे. तसेत टेक्निकल किंवा इतर अनेक कोर्सेस सध्या ऑनलाईन उपलब्ध आहेत, त्यांनाही चांगल्या शिक्षकांची गरज असते. ती गरज तुम्ही पूर्ण करु शकता. कुठे आहेत नोकरीच्या संधी? Skooli, Vedantu, BYJU’S,Chegg Tutors, Wyzant असे अनेक प्लॅटफॉर्म्सवर शिक्षकांची गरज असते. अश अॅप्स, वेबसाईट विविध विषयांसाठी शिक्षकांना नोकरी देत आहेत. त्यामुळे तुम्ही देखील अशा अॅप्स, वेबसाईट्सवर पार्ट टाईम शिकवू शकता. कोणाला ही संधी मिळू शकते? जर तुम्हाला एखाद्या विषयाचं उत्तम ज्ञान असेल आणि तो विषय तुम्ही मुलांना चांगला शिकवू शकत असाल तर तुम्हाला संधी मिळू शकते. मुलांचे प्रश्न सोडवण्यात तुम्ही सक्षम असायला हवे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला मुलांना शिकवता येणे शक्य असेल तर तुम्हाला दिवसातून एक-दोन तास खर्चून चांगली कमाई करण्याची संधी आहे. चांगल्या पद्धतीने व्हिडीओ शूट करता आला पाहिजे. प्रेजेंटेशन चांगलं करता आलं पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही सहज ही नोकरी मिळवू शकता. कशी मिळवाल नोकरी? संबंधित अॅप्स, वेबसाईट्सवर शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी मुलाखत द्यावी लागते. या प्लॅटफॉर्मवर आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर तुमची लेखी परीक्षा होईल. आणि त्यानंतर मुलाखत अशी एकंदर निवड प्रक्रिया आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मची निवड प्रक्रिया वेगळी असू शकते. पैसे किती मिळतील? ट्युशन्स असल्याने दिवसातून काही तासांसाठी तुम्हाला इथे शिकवावं लागेल. अंदाजे एक-दोन तासांचं एक लेक्चर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यातून तुम्ही दिवसातून दोन-तीन हजार रुपये सहज कमवू शकता. महिनाभराचा हिशेब केला तर 20-25 हजार रुपये तुम्ही सहज कमवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: career , job , money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात