• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Amazon Prime Day Sale 2021: उद्यापासून स्वस्तात मिळवा फ्रीज-AC, भरभक्कम सवलतीने खरेदी करा डिशवॉशर

Amazon Prime Day Sale 2021: उद्यापासून स्वस्तात मिळवा फ्रीज-AC, भरभक्कम सवलतीने खरेदी करा डिशवॉशर

अ‍ॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटचे प्राइम मेंबर असलेल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. उद्यापासून अ‍ॅमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ (Amazon Prime Day Sale) सुरू होणार आहे. जाणून घ्या एसी-फ्रीजवर काय आहेत ऑफर्स

  • Share this:
मुंबई, 25 जुलै: अ‍ॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटचे प्राइम मेंबर असलेल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. उद्यापासून अ‍ॅमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ (Amazon Prime Day Sale) सुरू होणार आहे. सध्या प्राइमचं सबस्क्रिप्शन घेतलेल्या ग्राहकांसाठी आणि आणखी ग्राहकांना प्राइमकडे आकर्षित करण्यासाठी हा सेल असेल. यामध्ये टीव्ही, फ्रीज, एसी, डिशवॉशर, स्मार्टफोन, लॅपटॉप अशा अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर, तसंच होम प्रॉडक्ट्स आणि फर्निचरवरही मोठी सूट देण्यात येणार आहे. 26 जुलै रोजी रात्री 12 वाजल्यापासून या प्राइम डे सेलची सुरुवात होणार आहे. 27 जुलै रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी हा सेल संपणार आहे. या सेलदरम्यान (amazon sale) मोठ्या डिस्काउंटसोबतच, काही उत्पादनांवर ‘नो कॉस्ट इएमआय’ आणि एक्सचेंज ऑफरही उपलब्ध असणार आहे. (Amazon exchange offers) एसी-फ्रीज-डिशवॉशर अधिक स्वस्त प्राइम डे सेलमध्ये एसींच्या किंमतीवर बरीच सूट देण्यात आली आहे. अवघ्या 16,999 रुपयांपासून या ठिकाणी एसी (AC) उपलब्ध असतील. एसीच्या क्षमतेनुसार त्यांची किंमत वाढत जाईल. 1 टन एसीची किंमत 16,999 रुपये, तर 1.5 टन एसीची किंमत 25,999 रुपये असणार आहे. तसंच, 2 टन एसी विकत घेतल्यास त्यावर 30 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. हे वाचा-FD Rule: मॅच्युरिटीवर नाही काढले पैसे तर मिळेल कमी व्याज, RBI ने बदलला नियम या सेलमध्ये कन्व्हर्टिबल फ्रीज (Convertible refrigerator) केवळ 22,290 रुपयांना उपलब्ध असणार आहे. एनर्जी एफिशिअंट फ्रीजची किंमत 13,690 असेल. तसंच, हाय कपॅसिटीचे फ्रीजही अवघ्या 12,499 रुपयांपासून उपलब्ध होणार आहेत. यासोबतच, बाजारात 39,990 रुपयांना उपलब्ध असणाऱ्या फॅबर 12 प्लेस सेटिंग्स डिशवॉशरवर मोठी सूट मिळणार आहे. एलजी 14 प्लेस सेटिंग्स वायफाय डिशवॉशरवरही मोठी सूट मिळमार आहे. या दोन कंपन्यांसोबतच बॉश आणि वोल्टास कंपनीच्या डिशवॉशर्सवरही सूट दिली जाणार आहे. (Amazon dishwasher price) हे वाचा-'या' शेअरने वर्षभरात दिला 500 टक्क्यांहून अधिक परतावा, गुंतवणुकदार मालामाल दरम्यान, 18 ते 24 वर्षं वयोगटातील तरुण-तरुणींना प्राइम मेंबरशिपसाठी यूथ ऑफर जाहीर करण्यात आली आहे. (Amazon Youth offer) यामध्ये त्यांना ठराविक मेंबरशिप प्लॅनवर 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. यासोबतच, या सेलदरम्यान एचडीएफसी बँकेचं क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना ईएमआय ट्रान्झॅक्शनवर 10 टक्के इन्स्टन्ट कॅशबॅकही देण्यात येणार आहे. तसंच प्राइम मेंबर्सना आपल्या अॅमेझॉन पे-आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अनलिमिटेड 5 टक्के रिवॉर्ड पॉइंट्सही मिळणार आहेत.
First published: