मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Amazon Prime Day 2020 Sale : स्वस्तात मिळणार 'हे' महागडे स्मार्टफोन, 300 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स होणार लाँच

Amazon Prime Day 2020 Sale : स्वस्तात मिळणार 'हे' महागडे स्मार्टफोन, 300 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स होणार लाँच

अ‍ॅमेझॉनचा धमाकेदार 'प्राइम डे सेल' (Amazon Prime Day 2020 Sale) ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये  असणार आहे.

अ‍ॅमेझॉनचा धमाकेदार 'प्राइम डे सेल' (Amazon Prime Day 2020 Sale) ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये असणार आहे.

अ‍ॅमेझॉनचा धमाकेदार 'प्राइम डे सेल' (Amazon Prime Day 2020 Sale) ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये असणार आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 23 जुलै : अ‍ॅमेझॉनचा धमाकेदार 'प्राइम डे सेल' (Amazon Prime Day 2020 Sale) ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये  असणार आहे. पुढील महिन्यामध्ये असणाऱ्या सण समारंभांच्या पार्श्वभूमीवर हा सेल महत्त्वाचा ठरणार आहे. अ‍ॅमेझॉनचा हा दोन दिवसीय सेल 6 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट या दिवशी असणार आहे. हा सेल अ‍ॅमेझॉन  प्राइम मेंबर्ससाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. 48 तासात वस्तूंची डिलिव्हरी, एक्सक्लूझिव्ह डिल्स आणि डिस्काउंट या मेंबर्सना देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊचा फटका ई-कॉमर्स कंपन्यांना देखील बसला आहे. दरम्यान या कालावधीमध्ये झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न या 'प्राइम डे सेल'च्या माध्यमातून Amazon करणार आहे. त्याचप्रमाणे विविध विक्रेत्यांना देखील ई-कॉमर्सचा प्लॅटफॉर्म त्यांच्या वस्तू विकण्यासाठी मिळत आहे.

कमी किंमतीत मिळणार iPhone 11, OnePlus 8

अ‍ॅमेझॉनने असे जाहीर केले आहे की, या प्राइम डे सेलमध्ये iPhone 11, OnePlus 8, OnePlus 7T, Samsung Galaxy M31 याशिवाय इतर काही - Oppo, Vivo, Honor या ब्रँडचे स्मार्टफोन कमी किंमतीमध्ये उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे सध्या विक्री सुरू असणाऱ्या फोनवर देखील अ‍ॅमेझॉनकडून लाँच ऑफर मिळणार आहे.

(हे वाचा-'या' बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर! आता कमी होणार तुमचा EMI)

या 'प्राइम डे सेल'मध्ये पहिल्यांदा विक्री होणारे काही नवे स्मार्टफोन देखील असणार आहेत. OnePlus Nord, Samsung Galaxy M31 (30 जुलै रोजी भारतात होणार लाँच) आणि Xiaomiचे काही नवी स्मार्टफोन देखील यामध्ये पाहायला मिळणार आहेत. 6 ऑगस्ट रोजी वनप्लस नॉर्ड 12 जीबी रॅम या मॉडेलची पहिल्यांदा विक्री होणार आहे. अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर तसा बॅनर देखील झळकत आहे. या फोनचा 6 जीबी रॅमचा व्हॅरिएंट सप्टेंबरमध्ये उपलब्ध होणार आहे.

Redmi 8A dual, Samsung Galaxy M21, Oppo A5 2020, Samsung Galaxy M11  हे बजेट फोन देखील या सेलमध्ये कमी दरात मिळणार आहेत.

(हे वाचा-पेन्शन आणि इन्शूरन्स सेवा देण्याच्या तयारीत WhatsApp, लवकरच होणार निर्णय)

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना मिळणार अतिरिक्त सूट

प्राइम डे सेलसाठी अ‍ॅमेझॉनने HDFC बँकेबरोबर पार्टनरशीप केली आहे. या बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड ग्राहकांना 10 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी ईएमआय पर्याय देखील आहे.

300 नवीन प्रोडक्ट्स होणार लाँच

काही मीडिया अहवालानुसार कंपनी एकूण 300 नवीन प्रोडक्ट्स या सेल दरम्यान लाँच करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सॅमसंग, फॅबइंडिया, इंटेल, डाबर, गोदरेज, मॅक्स फॅशन, जेबीएल, व्हर्पूल, डिकेथलॉन, हिरो सायकल्स, वन प्लस Xiaomiच्या उत्पादकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे छोट्या उद्योगांमधील साधारण 150 नवे प्रोडक्ट्स लाँच केले जाणार आहेत. यामध्ये खादी, Harvest Bowl, Orka, Kapiva इ. चा समावेश आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि स्वातंत्र्य दिन यासाठी अनुसरून वस्तू असणार आहेत.

First published: