• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • 'वर्षभरात देशातील सर्व टोल नाके बंद होणार'; नितीन गडकरींची मोठी घोषणा

'वर्षभरात देशातील सर्व टोल नाके बंद होणार'; नितीन गडकरींची मोठी घोषणा

(All toll plazas in the country will be closed in one year : लोकसभेत नितीन गडकरी यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. कसा असेल प्लान?

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 मार्च : केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री (Road Transport and Highways Minister) नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की, पुढील एका वर्षात सर्व टोल प्लाजा बंद करण्यात येतील आणि यासंदर्भात काम सुरू झाले आहे. भविष्यात नागरिकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने जितक्या रोडचा वापर करण्यात आला, तेवढाच टोल द्यावा लागेल. (All toll plazas in the country will be closed in one year'; Nitin Gadkari's big announcement) अमरोहाचे बीएसपीचे खासदार कुंवर दानिश यांनी मुक्तेश्वर जवळील रस्ते विभागाच्या सीमेवरील टोल प्लाजाचा मुद्दा उचलला तेव्हा नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. ते पुढे म्हणाले की, गेल्या सरकारमध्ये रस्ते प्रकल्पांच्या कंत्राटदारात शहरांच्या सीमा भागात अशा प्रकारचे टोल प्लाजा तयार करण्यात आले, जे नक्कीच चुकीचे आणि अन्यायकारक आहेत. हे ही वाचा-सर्वात मोठ्या टायर कंपनीची IPLमध्ये गुंतवणूक; दिली कोट्यवधींची स्पॉन्सरशीप ते आणि म्हणाले की, जर हे टोल प्लाजा हटवले तर रस्ते तयार करणारी कंपनी नुकसान भरपाई मागतील. मात्र सरकार पुढील एका वर्षात देशातील सर्व टोल प्लाजा बंद करण्याच्या योजनेवर काम करीत आहेत. नितीन गडकरी म्हणाले की, टोल बंद करण्याचा अर्थ टोल प्लाजा बंद करण्याशी संबंधित आहे. आणि सरकार अशा तांत्रिक गोष्टींवर काम करीत आहे, ज्यानुसार तुम्ही हायवेतील ज्या रस्त्यापासून सुरू कराल, तेथे जीपीएसच्या मदतीने कॅमेरा तुमचा फोटो घेईल आणि हायवेवरील ज्या भागातून तुम्ही बाहेर पडला तेथेदेखील तुमचा फोटो घेण्यात येईल. अशा प्रकारे तुम्ही हायवेच्या जितक्या रस्त्याचा वापर केला, तितकाच टोल चुकवावा लागेल. सरकार सातत्याने टोलच्या मुद्द्यावर काम करीत आहे. यासंदर्भात नुकताच कॅशलेश ट्रान्जॅक्शन करण्यासाठी FASTag पूर्ण पणे लागू करण्यात आला आहे. यामुळे टोल प्लाजावर वाढणाऱ्या रागांपासून सुटकारा मिळेल आणि कोणत्याही अडचणीशिवाय तुम्ही हायवेवर आपली गाडी चालवू शकाल.
  Published by:Meenal Gangurde
  First published: