मराठी बातम्या /बातम्या /मनी /सर्वात मोठ्या टायर कंपनीची IPLमध्ये गुंतवणूक; दिली कोट्यवधींची स्पॉन्सरशीप

सर्वात मोठ्या टायर कंपनीची IPLमध्ये गुंतवणूक; दिली कोट्यवधींची स्पॉन्सरशीप

IPLच्या येत्या हंगामात ही मल्टिनॅशनल कंपनी मुंबई इंडियन्‍स, चेन्‍नई सुपर किंग्‍ज, दिल्‍ली कॅपिटल्‍स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, कोलकाता नाइट राइडर्स, पंजाब किंग्‍ज आणि राजस्‍थान रॉयल्‍स यांना स्पॉन्सरशीप देणार आहे.

मुंबई 17 मार्च: IPL ही क्रिकेटमधील सर्वात मोठी लीग आहे. त्यामुळं जगभरातील कंपन्या IPLमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतात. मात्र गेल्या वर्षी कोरोनाचं संक्रमण आणि चीनसोबत सुरु असलेल्या मतभेदांमुळं IPL स्पर्धा काहीशी आर्थिक संकटात सापडली होती. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिडेट (Balkrishna Industries Limited) या कंपनीनं IPL स्पर्धेत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. IPLच्या येत्या हंगामात ही मल्टिनॅशनल कंपनी मुंबई इंडियन्‍स, चेन्‍नई सुपर किंग्‍ज, दिल्‍ली कॅपिटल्‍स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, कोलकाता नाइट राइडर्स, पंजाब किंग्‍ज आणि राजस्‍थान रॉयल्‍स यांना स्पॉन्सरशीप देणार आहे.

बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिडेट (Balkrishna Industries Limited) ही जगातील सर्वात मोठ्या टायर उत्पादन करण्याऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीला BKT Tires या नावानं देखील ओळखलं जातं. ही कंपनी केवळ क्रिकेटमध्येच नाही तर फुटबॉल, कब्बडी या स्पर्धांमध्येही मोठ्या प्रमाणावर स्पॉन्सरशीप देते. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या बिग बॅश या क्रिकेट लीगमध्येही त्यांनी स्पॉन्सरशीप दिली होती. कोरोना आणि लॉकडाउनमुळं ती स्पर्धा देखील आर्थिक संकटात सापडली होती. परंतु BKT Tires नं त्यांना मदतीचा हात पुढे या पार्श्वभूमीवर BKT Tiresच्या आगमनामुळं यंदाची IPL स्पर्धा आणखी भव्यदिव्य होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अवश्य पाहा - Coronavirus : क्रिकेटला पुन्हा फटका, मोठी स्पर्धा स्थगित करण्याचा BCCI चा निर्णय

बाळकृष्‍ण इंडस्‍ट्रीजचे संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. राजीव पोद्दार यांनी या कोट्यवधींच्या गुंतवणूकीवर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले. “क्रिकेट हा सर्व देशाला एकत्र आणणारा खेळ आहे. अन्  IPL ही स्पर्धा नसून दरवर्षी येणारा सण आहे. गेल्या वर्षी आपण लॉकडाउनमध्ये होतो. त्यामुळं या सणाचा आनंद आपल्याला घेता आला नाही. परंतु यावेळी नेहमीपेक्षा आणखी उत्साहात आपण IPL स्पर्धेचा आनंद घेणार आहोत. या आनंदात कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये म्हणून आम्ही ही स्पॉन्सरशीप दिली आहे. यामुळं क्रिकेट खेळ आणखी उंचीवर जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

First published:

Tags: Cricket, IPL 2021, Ipl 2021 auction