बँक ऑफ बडोदाने ट्विटरवरुन दिली माहिती- बँक ऑफ बडोदाने ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. हा मेगा ई-लिलाव सरफेसी कायद्याअंतर्गत (SARFAESI Act) करण्यात येणार आहे. बँक ऑफ बडोदाकडून रेसिडेंशियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, अॅग्रीकल्चर प्रॉपर्टी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. बँक ऑफ बडोदाकडून अशा प्रॉपर्टींचा लिलाव केला जाणार आहे, ज्या डिफॉल्टच्या यादीमध्ये आल्या आहेत. तुमच्या आवडीची प्रॉपर्टी खरेदी करण्याची ही संधी असल्याचं ट्वीट बँकेने केलं आहे.
या मालमत्तांचा होतो लिलाव- ज्या प्रापर्टीच्या मालकांनी त्या जागेचं कर्ज फेडलं नसेल किंवा एखाद्या कारणाने ते कर्ज देऊ शकत नसतील, त्या सर्वांची प्रापर्टी बँकेद्वारा जप्त केली जाते. बँकांकडून वेळोवेळी अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. अशाप्रकारच्या लिलावात बँक अशा प्रापर्टी विकून आपली रक्कम वसूल करुन घेतात.