मराठी बातम्या /बातम्या /मनी /

खरंच! फक्त 1126 रुपयांमध्ये विमान प्रवासाची संधी, त्वरित घ्या लाभ

खरंच! फक्त 1126 रुपयांमध्ये विमान प्रवासाची संधी, त्वरित घ्या लाभ

फक्त 1126 रुपयांमध्ये विमान प्रवासाची संधी, त्वरित घ्या लाभ

फक्त 1126 रुपयांमध्ये विमान प्रवासाची संधी, त्वरित घ्या लाभ

Republic Day Flight Ticket Offer : स्पाईसजेट एअरलाइन्स देशांतर्गत उड्डाणांवर 26 टक्के सूट देत आहे. या सवलतीसह तुम्ही 1126 रुपयांपासून फ्लाइट तिकीट बुक करू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 25 जानेवारी: विमानानं प्रवास करणं हे अनेकांचं स्वप्न असतं, पण विमानाची तिकीटं महाग असल्यामुळं अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. पण जर तुम्हाला ट्रेनपेक्षा कमी दरात विमानाने प्रवास करायचा असेल, तर तुम्ही 24 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ट्रेनपेक्षा कमी दरात तिकीट बुक करू शकता. यासाठी देशातील दोन आघाडीच्या एअरलाइन्सने प्रवाशांसाठी फ्लाइट तिकिटांवर उत्तम ऑफर देऊ केल्या आहेत. स्पाईसजेट आणि एअर इंडिया देशांतर्गत उड्डाणांवर भरघोस सूट देत आहेत. जेणेकरून प्रवाशांना कमी पैशात प्रवासाचा लाभ देता येईल.

टाटा समूहाच्या एअरलाइन्स एअर इंडियानं या वर्षातील सर्वात स्वस्त तिकीट दर सादर केले असून ही सवलत इकॉनॉमी क्लासच्या तिकिटावर उपलब्ध आहे. तिकीट सवलतीच्या यादीत 49 हून अधिक शहरांचा समावेश करण्यात आला आहे. एअर इंडिया फक्त 1705 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत हवाई प्रवास देत आहे. जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हीही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुकींग करू शकता.

दुसरीकडे, स्पाइसजेटने प्रजासत्ताक दिन तिकीट सेल ऑफर जाहीर केली आहे. एअरलाइन्स देशांतर्गत उड्डाणांवर 26 टक्के सूट देत आहेत. या सवलतीसह तुम्ही 1126 रुपयांपासून फ्लाइट तिकीट बुक करू शकता. हे विमान तिकीट काही ट्रेनच्या प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या तिकिटांपेक्षा कमी आहे. फ्लाइट तिकिटांवर ही ऑफर 24 जानेवारी 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आहे.

बुकिंग करण्याची ही शेवटची तारीख -

एअर इंडियाने ऑफर केलेल्या 49 अधिक डेस्टिनेशन्ससाठी तिकिट सवलती अंतर्गत प्रवासी 30 सप्टेंबरपर्यंत प्रवास करू शकतात. दुसरीकडे, स्पाइसजेटबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही 24 ते 29 जानेवारी 2023 पर्यंत तिकीट बुक करून 30 सप्टेंबरपर्यंत प्रवास करू शकता. जर तुम्हाला या दोन विमान कंपन्यांच्या मदतीने विमान प्रवास करण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्ही दोन्ही कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईट्सवर जाऊन विमान तिकीट बुक करू शकता. एअर इंडियाचं तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही airindia.in या वेबसाइटला भेट देऊ शकता.

हेही वाचा: बाजारात जाता पण सुट्टे पैसेच मिळत नाही? रिझर्व्ह बँक करतेय नवा प्लान

तुम्हीही प्रवास खर्च कमी करू शकता-

स्पाईसजेटच्या वेबसाइट spicejet.com वर जाऊन बुकिंग करता येईल. स्पाईसजेटनं सांगितलं आहे की, ही ऑफर अधिकृत वेबसाइटवरूनच दिली जात आहे. तुम्हीही कुठेही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणी बुकिंग करून तुम्ही तुमचा खर्च कमी करू शकता. तुम्ही ट्रेनच्या खर्चानं फ्लाइट्सद्वारे भेट देण्याच्या ठिकाणांवर पटकन पोहोचू शकता. यासाठी तुम्हाला जास्त भाडे द्यावे लागणार नाही.

तिकीट कसे बुक करावं?-

एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, ही विक्री सर्व एअर इंडिया शहरातील कार्यालये, विमानतळ कार्यालये, वेबसाइट, मोबाइल अॅप आणि ट्रॅव्हल एजंट्सद्वारे उपलब्ध असेल. या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे तिकीट बुक करू शकता. तिकीट बुकींगमध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर या ऑफर उपलब्ध असतील.

First published:

Tags: Air india, Domestic flight, Spicejet, Travel by flight, Travelling