भारतात जन्मलेल्या या अमेरिकन CEO चा पगार आहे 305 कोटी रुपये!

भारतात जन्मलेल्या या अमेरिकन CEO चा पगार आहे 305 कोटी रुपये!

मायक्रोसॉफ्ट (Microsoft)चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांचा पगार पाहिलात तर तुम्ही थक्क होऊन जाल. त्यांच्या पगारात वाढ होऊन हा पगार 305 कोटींवर पोहोचलाय.

  • Share this:

वॉशिंग्टन, 17 ऑक्टोबर : मायक्रोसॉफ्ट (Microsoft)चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांचा पगार पाहिलात तर तुम्ही थक्क होऊन जाल. त्यांच्या पगारात वाढ होऊन हा पगार वर्षाला 305 कोटींवर पोहोचलाय. 2018 - 19 या आर्थिक वर्षात मायक्रोसॉफ्टची आर्थिक प्रगती झाली. त्याचंच हे फळ आहे.

हैदराबादमध्ये जन्मलेले सत्या नडेला 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टचे CEO झाले. त्यांच्या कार्यकाळात मायक्रोसॉफ्टची चांगली भरभराट झाली. क्लाउड कॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात या कंपनीने चांगली कामगिरी केली आहे.कंपनीने त्यांचं टार्गेट पूर्ण केलंच. त्याशिवाय मायक्रोसॉफ्टच्या शेअरची किंमतही वधारली. त्यामुळे सत्या नडेला यांच्या पगारात वाढ झालीय.

मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या आर्थिक कामगिरीच्या अहवालात सत्या नडेला यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

(हेही वाचा : इथे राहणारे लोक खाऊ शकणार नाहीत Dominos पिझ्झा, कंपनीने घेतला मोठा निर्णय)

मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला, Google चे CEO सुंदर पिचाई आणि PepsiCo च्या माजी CEO इंद्रा नुई या त्रिमूर्तींचा अमेरिकेच्या कॉर्पोरेट क्षेत्रात मोठा दबदबा आहे. हे तिघंही जण भारतीय वंशाचे असल्याने भारतीयांनाही त्यांचा मोठा अभिमान आहे.सत्या नडेला यांच्या कामगिरीमुळेच मायक्रोसॉफ्ट ही कंपनी प्रगतिपथावर आहे. चांगल्या कामाचं इन्क्रिमेंटही त्यांना घसघशीत मिळालं.

=============================================================================================

VIDEO : सावरकरांना भारतरत्नच्या मागणीवर मनमोहन सिंग म्हणतात...

First published: October 17, 2019, 8:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading