मुंबई, 2 मे : टाटा समूहाने गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी यशस्वी बोली लावल्यानंतर 27 जानेवारी 22 रोजी एअर इंडिया या हवाई वाहतूक कंपनीचा ताबा घेतला होता. त्यामुळे सरकारी असलेली एअर इंडिया कंपनी ही टाटा (Tata Group) यांच्या मालकीची झाली. आता कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एका नवीन योजनेची घोषणा केली आहे. एअर इंडियाने (Air India) आपल्या काही कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी (Voluntary Retirement Scheme) प्रोत्साहन देण्यासाठी रोख रकमेसह इतर काही बक्षिसांची घोषणा केली. यासह स्वेच्छनिवृत्ती घेऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पात्रतेची वयोमर्यादा 55 वरून 40 पर्यंत कमी करण्यात आली आहे.
कर्मचार्यांना लिहिलेल्या पत्रात एअरलाइनने म्हटलं आहे की, एअर इंडियाच्या सध्याच्या नियमांनुसार, कायमस्वरुपी कर्मचारी जर त्यांचं वय 55 वर्षे असेल आणि त्यांनी 20 वर्षं नोकरी केली असेल तर ते स्वेच्छानिवृत्ती घेऊ शकतात. अतिरिक्त लाभ म्हणून कंपनी क्रू मेंबर्सची वयोमर्यादा 55 वरून कमी करून 40 वर्षे करत आहे. तसंच 1 जून 2022 ते 31 जुलै 2022 पर्यंत स्वेच्छानिवृत्ती म्हणजेच व्हॉलेंटरी रिटायरमेंटसाठी अर्ज करणार्या कर्मचार्यांना एकरकमी लाभाच्या रूपात भरपाईची रक्कम दिली जाईल. याशिवाय 1 जून ते 30 जूनदरम्यान स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करणार्या कर्मचार्यांना सानुग्रह अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त प्रोत्साहन रक्कम मिळेल. तसंच अर्ज स्वीकारणं हे व्यवस्थापनाच्या हातात असेल, असंही कंपनीने म्हटलंय. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय.
कर्जाचा EMI वाढणार, 'या' चार बँकानी होम लोनवरील व्याज दर वाढवले
नोव्हेंबर 2019 पर्यंत एअरलाईनमध्ये 9,426 कायमस्वरूपी कर्मचारी होते. मे मध्ये टाटा सन्सने हवाई उद्योग तज्ज्ञ कॅम्पबेल विल्सन यांची एअर इंडियाचे CEO आणि MD म्हणून नियुक्ती केली. कॅम्पबेल विल्सन यांना विमान वाहतूक उद्योगाचा 26 वर्षांचा अनुभव आहे. 1996 मध्ये न्यूझीलंडमध्ये सिंगापूर एअरलाइन्समध्ये (Singapore Airlines) मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली होती.
मेडिकल इन्शुरन्स सुविधा सुरू
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना नवीन मेडिकल इन्शुरन्सची (Medical insurance) सुविधा मिळू लागली आहे. या मेडिकल इन्शुरन्सची रक्कम 7.5 लाख रुपये असेल. कुटुंबातील सात सदस्यांना या इन्शुरन्समध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं. पहिला कर्मचारी, दुसरा त्याचा जोडीदार, तीन मुलं आणि आई-वडील किंवा सासू-सासरे हे मेडिकल इन्शुरन्सचे लाभार्थी ठरू शकतात. या मेडिकल इन्शुरन्समध्ये कॉर्पोरेट बफरची सुविधादेखील आहे. दरम्यान, दुसरीकडे कोविड काळात (Covid-19) एअर इंडियाच्या पायलट आणि क्रू मेंबर्सच्या वेतनात झालेली कपात आता टप्प्याटप्प्याने मागे घेतली जात आहे.
भारताच्या गव्हात म्हणे व्हायरस! तुडवडा असताना 'या' देशाने नाकारली भारताकडून मिळालेली गव्हाची खेप
18 हजार कोटी रुपयांना टाटा समूहाने विकत घेतली एअर इंडिया
टाटा समूहाची उपकंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडने 8 ऑक्टोबर 2021 रोजी एअर इंडिया 18000 कोटींना विकत घेतली. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Air india, Ratan tata, Tata group