मराठी बातम्या /बातम्या /मनी /कर्जाचा EMI वाढणार, 'या' चार बँकानी होम लोनवरील व्याज दर वाढवले

कर्जाचा EMI वाढणार, 'या' चार बँकानी होम लोनवरील व्याज दर वाढवले

HDFC, ICICI, बँक ऑफ इंडिया आणि PNB या चार बँकांनी त्यांच्या होम लोनचे दर वाढवले आहेत. त्यामुळे या बँकांमधून लोन घेणाऱ्यांना आता ईएमआयसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.

HDFC, ICICI, बँक ऑफ इंडिया आणि PNB या चार बँकांनी त्यांच्या होम लोनचे दर वाढवले आहेत. त्यामुळे या बँकांमधून लोन घेणाऱ्यांना आता ईएमआयसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.

HDFC, ICICI, बँक ऑफ इंडिया आणि PNB या चार बँकांनी त्यांच्या होम लोनचे दर वाढवले आहेत. त्यामुळे या बँकांमधून लोन घेणाऱ्यांना आता ईएमआयसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.

  मुंबई, 2 जून : देशातील महागाई (Inflation) सर्वसामान्यांची चिंता वाढवत आहे. इंधन, ऊर्जा आणि दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तुंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इंधन (Fuel) आणि गॅस (Gas) दरवाढीसह खाद्यपदार्थांच्या किमतीतही सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. अशातच आता चार प्रमुख बँकांनी होम लोनवरील (Home Loan) व्याजाच्या दरांत वाढ केली आहे. त्यामुळे आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता होम लोनच्या ईएमआयचेही जास्त पैसे भरावे लागणार आहे. कोणकोणत्या बँकानी होम लोनवरील व्याज दर वाढवले आहेत, ते जाणून घेऊयात.

  पीएनबीच्या व्याज दरात 0.15% वाढ

  पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) MCLR 0.15% ने वाढवला आहे. नवे व्याजदर 1 जूनपासून लागू झाले आहेत. यानंतर आता ओव्हरनाइट कर्जासाठी (Overnight Loan) नवीन व्याजदर 6.75% असेल. तर एका महिन्याच्या लोनसाठी 6.80%, तीन महिन्यांसाठी 6.90%, सहा महिन्यांसाठी 7.10%, एका वर्षासाठी 7.40% आणि 3 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी हा दर 7.70% असेल. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय.

  भारताच्या गव्हात म्हणे व्हायरस! तुडवडा असताना 'या' देशाने नाकारली भारताकडून मिळालेली गव्हाची खेप

  HDFC ने व्याजदरात 0.05% केली वाढ

  तारणावर लोन देणारी हाउसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसीने (HDFC) कर्जाच्या व्याजदरात 0.05% वाढ केली आहे. ही वाढ पीएनबीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे जर तुम्ही एचडीएफसीकडून होमलोन घेतलं असेल, तर तुमचा ईएमआय फार नाही तर किरकोळ वाढेल. 30 लाख रुपयांपर्यंतच्या होमलोनसाठी महिलांना आता 7.10% व्याज द्यावं लागणार आहे, तर इतरांसाठी ते 7.15% असेल. तसंच 75 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जांवरील कमाल व्याज दर 7.40% आणि त्यापेक्षा जास्त रुपयांवरील कर्जासाठी हा दर 7.50% असेल.

  बँक ऑफ इंडियाच्या व्याजदरांतही वाढ

  बँक ऑफ इंडियानेही (Bank Of India) MCLR वाढवला आहे. नवीन दरांनुसार ओव्हरनाइट कर्जासाठी आता व्याजदर 6.70% असेल. तर एका महिन्याच्या कर्जासाठी 7.05%, तीन महिन्यांसाठी 7.10%, सहा महिन्यांसाठी 7.20% आणि एका वर्षासाठी 7.35% आणि 3 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या कर्जासाठी 7.70% व्याजदर (Interest Rate) असेल.

  डिझेल इंजिन ट्रेनसाठी किती इंधन खर्च होत असेल? एका लीटरमध्ये किती धावते माहितीये का?

  ICICI बँकेचं होमलोनही महागलं

  ICICI बँकेनेही लोनसाठी MCLR वाढवला आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, आता ओव्हरनाइट लोनसाठी नवीन व्याजदर 7.30% असेल. तर एका महिन्याच्या कर्जासाठी 7.30%, तीन महिन्यांसाठी 7.35%, सहा महिन्यांसाठी 7.50% आणि एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीच्या कर्जासाठी 7.55% असेल.

  अशा रितीने HDFC, ICICI, बँक ऑफ इंडिया आणि PNB या चार बँकांनी त्यांच्या होम लोनचे दर वाढवले आहेत. त्यामुळे या बँकांमधून लोन घेणाऱ्यांना आता ईएमआयसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.

  First published:

  Tags: Hdfc bank, Home Loan, Icici bank, Pnb