मुंबई, 16 मे : महागाई (Inflation) वाढत असताना आता विमान प्रवास आता महाग होऊ शकतो. सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा हवाई इंधनाच्या दरात वाढ (Air Turbine Fuel Price Hike) करण्याचा निर्णय घेतला आहे. एटीएफच्या किमती 5 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. या दरवाढीनंतर विमान इंधनाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. 2022 मध्ये विमान इंधनाच्या किमती दहाव्यांदा वाढल्या आहेत. एबीपी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
पाच टक्के वाढ
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमानाच्या इंधनावरही परिणाम झाला आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी एटीएफच्या किमती 5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. देशाच्या राजधानी दिल्लीत ATF ची किंमत 123,039.71 रुपये प्रति किलोलीटर म्हणजेच 123 रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे.
Investment Tips: तीन वर्षाच्या मुलाच्या नावे PPF खातं सुरु करा; 15 वर्षात 32 लाख जमा होतील
15 दिवसांनी किमतींचे पुनरावलोकन
सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला विमान इंधनाच्या किमतींचा आढावा घेतात. यावर्षी 1 जानेवारीपासून हवाई इंधन जवळपास 62 टक्क्यांनी महागले आहे.
कोलकाता आणि मुंबईत किंमत किती?
मुंबईत एटीएफची किंमत आता 121,847.11 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. कोलकात्यात 127,854.60 रुपये आणि चेन्नईमध्ये 127,286 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे.
LIC चे स्वस्तात शेअर खरेदीची संधी, कसं? तज्ज्ञांकडून समजून घ्या
महागड्या हवाई इंधनाचा फटका विमान उद्योगाला
महागड्या कच्च्या तेलामुळे गेल्या चार महिन्यांत हवाई इंधनाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा फटका देशातील विमान उद्योगाला सहन करावा लागू शकतो. महागड्या हवाई इंधनामुळे विमान कंपन्या भाडे वाढवत असून, त्याचा परिणाम विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवर होत आहे. रेटिंग एजन्सी ICRA ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, एटीएफच्या वाढत्या किमतींचा देशाच्या विमान उद्योगाच्या रिकव्हरीवर परिणाम होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Air india, Airplane, Petrol, Price hike