विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 17 जून: सध्या शेतीपुरक व्यवसाय म्हणून काहीजण मधमाशी पालन करत आहेत. नागपुरातील विजय भगत या तरुणाने पडीक जागेवर बाग फुलवून त्यात मधमाशी पालन सुरू केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्याने केलेल्या प्रयोगाचा आर्थिक लाभही होत आहे. महिन्याला 15-20 किलो मध मिळत असून त्यातून बागेच्या संगोपनाचा खर्च निघत आहे. विजयच्या या प्रयोगाने निसर्ग संवर्धनासह रोजगार निर्मितीही झाली आहे. विद्यापीठातील पडीक जागेवर मधमाशी पालन नागपूर शहराच्या परिघात मोठ्या प्रमाणात वन संपदा आहे. शिवाय नागपूर हे एक हिरवे शहर असून ही फार मोठी उपलब्धी आहे. आपल्या इथे शासकीय अथवा निम शासकीय विभागात फार मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध आहे. या जागेचा वापर मधमाशी पालनासाठी करू शकतो हा विचार डोक्यात आला. नागपुरातील विद्यापीठाच्या पोस्ट ग्रॅज्युएशन डिपार्टमेंट ऑफ गांधी थॉट विभागातील 2 एकर जागेसाठी आम्ही विचारणा केली. त्याची उपयोगिता समजावून सांगितल्या नंतर येथील विभाग प्रमुख वाटकर सर यांनी संमती दिली, असं भगत यानं सांगितलं.
मधमाशांना पुरक झाडे, वेलींची लागवड दोन एकर जागेवर मधमाशांना पुरक झाडी, वेलींची लागवड केली. त्यामुळे मधमाशांसाठी अनुकूल वातावरण तयार झाले. सर्व कौशल्य वापरून पडीक जागा उपयोगात आणली. त्या ठिकाणी 6-7 मधमाशांच्या पेट्या लावल्या. त्यातून महिन्यातून 15-20 किलो मध निघत आहे. या मधाच्या पैशातून या ठिकाणचा खर्च निघत आहे. मधमाशी पालन एक उत्तम व्यवसाय निसर्गात मधमाश्यांचे अन्यन्य साधारण महत्व आहे. परागीकरनातून फार मोठ्या प्रमाणावर निसर्गाला फायदा होत असतो. एक मधमाशी दिवसाला 60-78 फुलांना भेट देऊन त्यातील परागकण शोषून घेत असते. त्याचे महत्त्व आम्ही इतरांना समजावून सांगत असतो. दर रविवारी या ठिकाणी शहरातील निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमी यांना बोलावून आम्ही या बद्दल जनजागृती करत असतो, असे भगत याने सांगतिले. शेतकऱ्याला मिळाला यशाचा मंत्र, देशी गाईंचं संगोपन ठरतंय फायद्याचं, Video मधमाशी पालन व्यवसाय फायद्याचा मधमाशी हे नाव जरी उच्चारले तर तिचे चावणे हेच आपल्या पुढे सर्वप्रथम येतं. मात्र तिची दुसरी महत्त्वपूर्ण बाजू समजली तर हा एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो. मधमाशी पालन व्यवसाय करायचा झाला तर फार मोठ्या जागेची अथवा भांडवलाची आवश्यकता नसते. तर फक्त इत्यंभूत माहिती, प्रशिक्षण आणि इच्छाशक्तीची गरज असते. आम्ही देखील या बाबत मोफत प्रशिक्षण देत असतो. आज अनेक लोक आम्हाला जॉईन झाले असून ते या व्यवसायात यशस्वी झाले आहे, असे भगत म्हणतो. रोजगार उपलब्ध करून देणे हे ध्येय नागपूर आणि नागपूरच्या आसपास मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्यामुळे मधमाशांची फार मोठी संख्या आपल्या इथे बघायला मिळते. सातेरी, त्रिगोना या देशी मधमाशांच्या देखील इथे अधिक आहे. मी देशभर फिरून तिथल्या मधमाशी आणि मधाचा अभ्यास केला आहे. आज 9-10 प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे पूर्णतः नैसर्गीक मध विकतो आहे. त्यातून माझा उदरनिर्वाह होती. आगामी काळात भारत जगभरात मध उत्पादनात अग्रगण्य व्हावा हे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. तसेच या व्यवसायातून अधिक रोजगार उपलब्ध करून देणे हा आमचा मानस आहे, अशी माहिती मध उत्पादक विजय भगत यांनी दिली.