जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PMC बँकेसारखा धोका टाळायचा असेल तर पैसे गुंतवण्यासाठी हे आहेत सुरक्षित पर्याय

PMC बँकेसारखा धोका टाळायचा असेल तर पैसे गुंतवण्यासाठी हे आहेत सुरक्षित पर्याय

PMC बँकेसारखा धोका टाळायचा असेल तर पैसे गुंतवण्यासाठी हे आहेत सुरक्षित पर्याय

PMC बँक गोत्यात आल्यानंतर खातेदारांना त्यांनी कष्टाने गुंतवलेल्या पैशांची चिंता लागून राहिली आहे. तुम्हाला जर तुमची गुंतवलेली रक्कम 100 टक्के सुरक्षित राहावी असं वाटत असेल तर त्यासाठी काही पर्याय आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : पंजाब अँड महाराष्ट्र बँक म्हणजेच PMC बँक गोत्यात आल्यानंतर खातेदारांना त्यांनी कष्टाने गुंतवलेल्या पैशांची चिंता लागून राहिली आहे. खऱंतर बँकेतल्या प्रत्येक खात्यावर 1 लाख रुपयांपर्यंत डिपॉझिट इन्शुरन्स आहे. देशाच्या इतिहासात आजपर्यंत कोणतीही व्यावसायिक बँक पूर्णपणे बुडालेली नाही. कोणत्याही खातेदाराचे पैसे बुडू नयेत म्हणून काही बँकांचं विलिनीकरण करण्यात आलं आहे. बँकांमधलं सेव्हिंग अकाउंट,करंट अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट, बँकेतलं फिक्स्ड डिपॉझिट या सगळ्यावर 1 लाख रुपयांचा इन्शुरन्स असतो. यामध्ये मूळ रक्कम आणि त्यावरच्या व्याजाचाही समावेश असतो. पण तुम्हाला जर तुमची गुंतवलेली रक्कम 100 टक्के सुरक्षित राहावी असं वाटत असेल तर त्यासाठी काही पर्याय आहेत. 1. गव्हर्नमेंट सेव्हिंग बाँड केंद्र सरकार 7 वर्षांसाठी 7.75 टक्के सेव्हिंग बाँड गव्हर्नमेंट सेव्हिंग बाँड जारी करतं. सध्या बँकांच्या एफडी वरचं व्याज कमी होत चाललं आहे. पण सरकारतर्फे जारी केलेला हा बाँड जास्त काळासाठी गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. या बाँड्सवर 6 महिन्यांच्या काळासाठी मॅच्युरिटीच्या वेळी व्याज मिळतं. या रकमेवर कर असतो. या बाँडमध्ये 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 7 वर्षांत तुम्हावा 17 लाख 3 हजार रुपये मिळतील. (हेही वाचा : OLA ने सुरू केली नवी सेवा, कार भाड्याने घ्या आणि स्वत: चालवत हवं तिथे जा) 2.पोस्टाच्या योजना सरकारने पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्किम वर मिळणाऱ्या व्याजदरात कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. पोस्टाने मोबाइल बँकिंगची सुविधा दिली आहे. यात तुम्ही घरबसल्या गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेत 1, 2 आणि 3 वर्षांसाठी 6.9 टक्के दराने व्याज मिळतं. 5 वर्षांच्या गुंतवणुकीसाठी 8.6 टक्के व्याज आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट वर 7.9 टक्के व्याज आहे. पोस्ट ऑफिसमधल्या गुंतवणुकीवर जास्त सुरक्षा मिळते. (हेही वाचा : OLA ने सुरू केली नवी सेवा, कार भाड्याने घ्या आणि स्वत: चालवत हवं तिथे जा) 3. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज केंद्र सरकारने गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जारी करतं. यामध्ये गुंतवणूक करणं हा सुरक्षित पर्याय आहे. पण या पॉलिसी मॅच्युअर होईपर्यंत यातून पैसे काढता येत नाहीत. या योजनेत पैसे गुंतवले तर सेकंडरी मार्केट म्हणजेच NSE प्लॅटफॉर्मवर त्यांची खरेदी-विक्री करता येते. 4. प्रधानमंत्री व्यय वंदना योजना या योजनेत 10 वर्षांसाठी 8 टक्के दराने व्याज मिळेल. यामध्ये गुंतवणूकदार मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक अशा टप्प्यांमध्ये नियमित इनकम मिळवू शकतात. ही सरकारी योजना LIC तर्फे दिली जाते. याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 पर्यंत आहे. या योजनेत जास्तीत जास्त 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. ============================================================================================ VIDEO: अमृता फडणवीसांनी जाहीर केला दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाचा निकाल, म्हणाल्या…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money , PMC
  • First Published :
जाहिरात
जाहिरात