मराठी बातम्या /बातम्या /मनी /दोन दिवसानंतर 50 रुपये लीटरपर्यंत स्वस्त होऊ शकतं खाद्य तेल; हे आहे कारण

दोन दिवसानंतर 50 रुपये लीटरपर्यंत स्वस्त होऊ शकतं खाद्य तेल; हे आहे कारण

खाद्य तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे, तेल स्वस्त होण्याची कारणं आता समोर येऊ लागली आहेत. यामुळेच गेल्या चार दिवसांत खाद्य तेलांच्या किंमतीत 15 टक्के कमी आली आहे.

नवी दिल्ली, 14 जून : देशात ज्यावेळी खाद्य तेलाच्या (Edible oil) किंमती वाढू लागल्या होत्या, त्यावेळी यासंबंधित सर्व कारणं एकाच वेळी समोर येऊ लागली होती. परंतु आता खाद्य तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे, तेल स्वस्त होण्याची कारणं आता समोर येऊ लागली आहेत. यामुळेच गेल्या चार दिवसांत खाद्य तेलांच्या किंमतीत 15 टक्के कमी आली आहे.

यापैकी सर्वात मोठ्या कारणावर मंगळवारी अमेरिकेत निर्णय घेतला जाऊ शकतो. या निर्णयानंतर खाद्यतेल 40 ते 50 रुपये लीटरपर्यंत स्वस्त होण्याची चर्चा होऊ लागली आहे.

दोन दिवसानंतर 50 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतं तेल -

अखिल भारतीय खाद्य तेल व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका, मलेशिया आणि इंडोनेशियामधून मोठ्या प्रमाणात तेलाची आयात होते. परंतु काही दिवसांपूर्वी अमेरिकेत बायो फ्यूलमध्ये 46 टक्क्यांपर्यंत रिफाइंड ऑईल मिसळण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी ही टक्केवारी 13 इतकी होती. तसंच ईदमुळे मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये काम कमी झाल्याने प्रोडक्शनवर याचा परिणाम होतो. काही देशांमध्ये हवामानामुळे पिकांचंही नुकसान झालं आहे. भारतात तेलाच्या किंमती वाढण्यामागे ही काही प्रमुख कारणं आहेत.

(वाचा - सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ, महागाईच्या दराने गाठला 6 महिन्यांतला उच्चांक)

परंतु मंगळवारी अमेरिकेत पुन्हा एकदा बायो फ्यूलमध्ये, इतर खाद्य तेल किती टक्क्यांपर्यंत मिसळले जावेत, यावार विचार होणार आहे. यात 46 टक्केच रिफाइंड ऑईल मिसळण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसंच आता मलेशिया आणि इंडोनेशियामध्येही प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे याचा परिणाम भारतीय बाजारात पाहायला मिळू शकतो.

स्थानिक तेल व्यापारी लाला गिरधारी लाल गोयल यांनी सांगितलं, की यावर्षी मोहरीचं रेकॉर्डब्रेक 86 लाख टन उत्पादन झालं आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीहून अतिशय जास्त आहे. नवीन मोहरीचं उत्पादन होणं हेदेखील तेलाच्या किंमती कमी होण्यामागे एक कारण आहे.

First published:
top videos

    Tags: Price