मराठी बातम्या /बातम्या /मनी /सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ, महागाईच्या दराने गाठला 6 महिन्यांतला उच्चांक

सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ, महागाईच्या दराने गाठला 6 महिन्यांतला उच्चांक

मे महिन्यातील किरकोळ महागाई दर (CPI) 4.23 टक्क्यांवरून वाढून 6.30 टक्क्यांवर आला आहे. वाढीचा हा दर  5.39 टक्क्यांवर राहण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती.

मे महिन्यातील किरकोळ महागाई दर (CPI) 4.23 टक्क्यांवरून वाढून 6.30 टक्क्यांवर आला आहे. वाढीचा हा दर 5.39 टक्क्यांवर राहण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती.

मे महिन्यातील किरकोळ महागाई दर (CPI) 4.23 टक्क्यांवरून वाढून 6.30 टक्क्यांवर आला आहे. वाढीचा हा दर 5.39 टक्क्यांवर राहण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती.

नवी दिल्ली, 14 जून : महागाईचा सध्या सर्वसामान्यांना दुहेरी झटका बसला आहे. सोमवारी सकाळी घाऊक महागाई दर 12.94 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आता जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मेमध्ये किरकोळ महागाई (Retail Inflation) दर 6.3 टक्क्यांपर्यंत वाढला होता. किरकोळ महागाईचा हा दर गेल्या 6 महिन्यांतील उच्चांकी आहे. सोमवारी सरकारने जाहीर केलेल्या किरकोळ महागाईच्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे.

मे महिन्यातील किरकोळ महागाई दर (CPI) 4.23 टक्क्यांवरून वाढून 6.30 टक्क्यांवर आला आहे. वाढीचा हा दर  5.39 टक्क्यांवर राहण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती. मे महिन्यात खाण्या-पिण्याच्या वस्तूंची किरकोळ महागाई एप्रिल महिन्याच्या 1.96 टक्क्यांवरून वाढून 5.01 टक्क्यांवर गेली आहे. भाजीपाल्याच्या महागाईतही वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

इंधन आणि वीज महागाई 11.58 टक्क्यांपर्यंत 

मे महिन्यात इंधन आणि विजेची महागाई एप्रिलमधील 7.91 टक्क्यांवरून थेट 11.58 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण महागाई दर 3.73 टक्क्यांवरून 3.86 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मेमध्ये कपडे, पादत्राणे, चप्पल बूट यांची महागाई 5.32 टक्क्यांवर पोहचली आहे. महिन्यानुसार महिन्यानुसार जाहीर होणारा डाळींचा महागाई दर मेमध्ये 7.51 टक्क्यांवरून 9.39 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मे महिन्यातील कोर चलनवाढ एप्रिलमधील 5.40 टक्क्यांवरून 6.6 टक्क्यांवर गेली आहे.

हे वाचा - कोरोना काळात महागाईनं मध्यमवर्गाचं कंबरडं मोडलं; तेल, किराणाच्या किमती 50 टक्क्यांनी वाढल्या

घाऊक किमतींवर आधारित महागाई दर मे महिन्यात 12.84 टक्क्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या आणि उत्पादित वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याने ही वाढ झाली आहे. बेस इफेक्टमुळे मे 2021 मध्ये डब्ल्यूपीआय महागाईत वाढ झाली आहे. मे 2020 मधील डब्ल्यूपीआय महागाई निर्देशांक 3.37 टक्के होता.

First published:
top videos

    Tags: Inflation