मुंबई, 11 जून : विमानांने प्रवास करणं अनेकांच स्वप्न असतं. तर अनेकांनी विमानाने प्रवासही केला असले. पण एवढ्या शक्तिशाली विमानाला उडवण्यासाठी किती इंधन वापरले जाते याचा कधी विचार केला आहे का? यासोबतच विमानातील इंजिन किती शक्तिशाली आहे यावर देखील ते अवलंबून असते. एका अंदाजानुसार, बोइंग 747 दर सेकंदाला सुमारे 4 लिटर इंधन वापरते. त्यानुसार एका मिनिटात सुमारे 240 लिटर पेट्रोल खर्च होते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की विमानात वापरलेले सर्व पेट्रोल कुठे साठवले जाते? विमानात वापरलेले इंधन त्याच्या मुख्य भागामध्ये कुठेच साठवलं जात नाही. तर ते विमानाच्या पंखांमध्ये साठवलं जातं. होय, उड्डाणासाठी वापरले जाणारे जड इंधन त्याच्या दोन्ही पंखांमध्ये स्टोअर जाते.
विमानांची दुनिया या सिरीजमध्ये आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
पंखांमध्ये का साठवले जाते इंधन
विमानाच्या पंखांमध्ये इंधन साठवण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा बॅलेन्स राखणे. विमान उडवण्यासाठी, लिफ्ट फोर्स बॅलेन्स असणे आवश्यक आहे. म्हणूनच विमानाच्या वजनाइतके लिफ्ट फोर्स असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे विमानाच्या पंखांमध्ये इंधन ठेवले जाते. समजा उड्डाणाच्या मागील भागात इंधन साठले असेल, तर मागील भागामध्ये जास्त वजन असल्याने, पुढचा भाग उड्डाणाच्या वेळी वर येईल. तर उड्डामाच्या वेळी फ्यूल संपल्यामुळे लँडिंगच्या वेळी पुढचा भाग पुढे झुकेल. यामुळे फ्यूल प्लेनच्या विंग्समध्ये ठेवलं जातं.
Flight Attendants Rules: फ्लाइट अटेंडेंट्सला परफ्यूम लावण्याचीही नसते परवानगी, फॉलो करावे लागतात हे कठोर नियमविमानाचे पंख पोकळ असतात
विमानाचे पंख दिसायला खूप मोठे असले तरी आतून पोकळ असतात. या पंखांमध्ये जेट इंधन साठवले जाते. याशिवाय इंधन दुसरीकडे कुठे साठवून ठेवल्यास विमानाचे वजनही वाढेल.
Airplane Facts : इमर्जन्सी लँडिंगमध्ये पायलट का सांडून देतो विमानाचं इंधन, याचं कारण माहितीये का?विंग्समध्येच असतं इंजिन
बहुतेक विमानांमध्ये, इंजिन देखील पंखांमध्ये असतात. अशा वेळी इंधन इंजिनमध्ये ठेवून ते इंजिनपर्यंत पोहोचण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागत नाही आणि हे इंधन एका छोट्या पाईपद्वारेच इंजिनपर्यंत पोहोचते. यामुळे पैसे आणि वजन दोन्हीची बचत होते.