जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Airplane Facts: शेकडो लोकांना घेऊन आकाशात उडणारं विमान किती रुपयांचं? कधी विचार केलाय?

Airplane Facts: शेकडो लोकांना घेऊन आकाशात उडणारं विमान किती रुपयांचं? कधी विचार केलाय?

किती रुपयांना मिळतं विमान?

किती रुपयांना मिळतं विमान?

कोणत्याही विमानाची किंमत ही त्याची क्षमता, सुविधा आणि त्यात वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक मशीन्सवर अवलंबून असते. विमान खरेदी करण्यासाठी किती पैसे लागतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 मे : कमी वेळेत लांबचा प्रवास करण्यासाठी विमान हा सर्वोत्तम पर्याय असतो. विमान प्रवास थोडा महाग तर असतो मात्र यामुळे आपला बराच वेळ वाचतो. आजही देशातील सर्वाधिक लोकसंख्या अजुनही विमानात बसलेली नाही. कारण याचं तिकिट सर्वसामान्यांना परवडणारं नसतं. मग एवढ्या मोठ्या विमानाची किंमत किती असेल हा प्रश्न तुमच्या मनात कधी आलाय का? विमानाची तिकिटे महाग आहेत, पण शेकडो लोकांना घेऊन जाणाऱ्या या प्रचंड विमानाची किंमत काय असेल? आज विमानांची दुनिया या सिरीजमधून आपण विमानाच्या किंमतीविषयी  जाणून घेणार आहोत.

News18लोकमत
News18लोकमत

विमानाची किंमत किती?

विमानाची कोणतीही निश्चित किंमत नाही. कारण त्यात वापरलेली उपकरणे, सुविधा आणि त्याचा आकार यावर त्याची किंमत ठरत असते. पण तरीही, जर आपण सर्वात महागड्या विमानांबद्दल बोललो, तर बोइंग कंपनीच्या विमानांची किंमत इतर विमानांपेक्षा जास्त आहे. क्षमता आणि सुविधांनुसार विमानाची किंमत कमी-अधिक असू शकते. प्रवासी विमानांच्या किमतींबद्दल बोलताना, फायनान्स ऑनलाइन वेबसाइटनुसार, B-2 स्पिरिट विमानाची किंमत 737 मिलियन डॉलर (सुमारे 60 अब्ज रुपये), तर गल्फस्ट्रीम IV विमानाची किंमत38 मिलियन डॉलर(सुमारे 3 अब्ज 12 कोटी रुपये) आहे. विमानाचा वापर आणि त्यात झालेला खर्च यामुळे किमतीतील तफावत आहे.

रेल्वेसोबत मिळून सुरु करा बिझनेस, कधीच कमी होणार नाही ग्राहकांच्या रांगा

विमानांना लागतो खूप खर्च

विमान तयार करण्यासाठी खूप मेहनत आणि अनेक प्रकारची अत्याधुनिक यंत्रे लागतात. त्यामुळे त्यांची किंमत खूप जास्त आहे. अमेरिकेची विमाने सर्वात अत्याधुनिक मानली जातात. याच कारणामुळे बोइंग विमानांमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत आणि यामुळेच त्यांची किंमत देखील खूप जास्त आहे. मात्र, काही विमाने कमी किमतीचीही आहेत. अशी विमाने बहुतेक वैयक्तिक वापरासाठी असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात