मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Recurring Deposit चे फायदे आणि तोटे; RD करण्यापूर्वी तुम्हाला हे माहिती असायला हवं

Recurring Deposit चे फायदे आणि तोटे; RD करण्यापूर्वी तुम्हाला हे माहिती असायला हवं

जोखीममुक्त बचतीसाठी अनेक पर्यायांमध्ये रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) उत्तम मानला जात असला तरी त्याचे फायदे आणि तोटे अशा दोन्ही बाजू आहेत.

जोखीममुक्त बचतीसाठी अनेक पर्यायांमध्ये रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) उत्तम मानला जात असला तरी त्याचे फायदे आणि तोटे अशा दोन्ही बाजू आहेत.

जोखीममुक्त बचतीसाठी अनेक पर्यायांमध्ये रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) उत्तम मानला जात असला तरी त्याचे फायदे आणि तोटे अशा दोन्ही बाजू आहेत.

मुंबई, 29 नोव्हेंबर : मुलांचं शिक्षण, विवाह, गृहखरेदी, कार खरेदी आदी विशिष्ट उद्दिष्टांसाठी बहुसंख्य लोक बचतीचा (Saving) मार्ग अवलंबतात. अर्थात या मार्गातून उत्पन्न मिळवणं हाच त्यांचा प्रमुख उद्देश असतो.  सध्याच्या काळात बचत (Saving tips) करू इच्छिणाऱ्यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, तरीदेखील प्रत्येकाचा कल हा सुरक्षित बचतीकडं असतो. बचतीच्या अनुषंगानं अनेक खासगी, सहकारी तसेच शासकीय बॅंका आणि वित्तीय संस्था विविध योजना सातत्यानं जाहीर करत असतात. या देखील बचत करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतात. जोखीममुक्त बचतीसाठी अनेक पर्यायांमध्ये रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) आणि फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) हे दोन प्रमुख मानले जातात.

'आरडी'त (RD) तुम्ही 6 महिने ते 10 वर्षे कालावधीसाठी ठराविक रक्कमेची बचत करून व्याजाच्या आधारे अधिक रक्कम मिळवू शकता. म्युचअल फंडात बचत करताना एसआयपी (SIP) हा घटक असतो अगदी त्याचप्रमाणे तुम्ही 'आरडी'त बचत करू शकता. आरडी अकाउंट सुरू करण्याचे काही फायदे तसेच तोटेदेखील (Advantages and disadvantages of saving in RD) आहेत. या फायद्यातोट्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

रिकरिंग डिपॉझिट अकाउंट सुरू करण्याचे प्रमुख फायदे

- आज बहुतांश बॅंका किंवा वित्तीय संस्था 'आरडी'ची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देतात. आरडी अकाउंट सुरू करण्याची एकूण प्रक्रिया ही अगदी सहज आणि सोपी असते. अगदी वैयक्तिक पातळीवरही तुम्ही हे अकाउंट सुरू करू शकता. त्यातही तुम्ही संबंधित बॅंकेचे किंवा वित्तीय संस्थेचे खातेधारक असाल तर तुम्हाला पुन्हा डॉक्युमेंटस (Documents) सबमिट करण्याची गरज नसते.

- अल्पकालीन उद्दिष्टांसाठी (Short term Goals) गुंतवणुकीकरिता आरडी अकाउंट हा उत्तम पर्याय असतो. या माध्यमातून जोखीम मुक्त चांगला परतावाही मिळू शकतो.

- सेव्हिंग अकाउंटच्या तुलनेत आरडी अकाउंटवर मिळणारा व्याज दर (Interest Rate) हा अधिक असतो.

- आरडी अकाउंटमध्ये तुम्ही तुमच्या सेव्हिंग खात्यातून परस्पर रक्कम जमा करू शकता. याकरिता तुम्हाला बॅंकेत जाण्याची गरज नसते.

- आरडी अकाउंटमधून अंशिक पैसे काढण्याची परवानगी नसते.

- आरडीचा व्याजदर हा बॅंक, बचतीचा कालावधी आणि रकमेवर अवलंबून असतो.

हे वाचा - देशातल्या प्रमुख बॅंका रिकरिंग डिपॉझिटवर किती देतात व्याजदर; जाणून घ्या माहिती

- आरडीत दरमहा अगदी 100 रुपये जमा करून तुम्ही बचतीस प्रारंभ करू शकता.

- दरमहा तुम्हाला आरडी अकाउंटमध्ये ठराविक रक्कम जमा करावी लागत असल्यानं आर्थिक शिस्त निर्माण होते आणि बचतीची सवय लागते.

- ज्येष्ठ नागरिकांना आरडीवर 0.5 टक्के अधिक व्याज दर मिळतो.

- तुम्ही जर एखाद्या महिन्यात आरडी अकाउंटमध्ये रक्कम जमा करू शकला नाहीत तर संबंधित बॅंक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला दंड आकारत नाही. याचा अर्थ आरडीमध्ये बचत करताना फ्लेक्झिबिलीटी (Flexibility) देखील मिळते.

- अल्पवयीन मुलांनी (Minors) जर आरडी अकाउंट सुरू केलं तर त्याच्या पालकांच्या देखरेखीखाली हे अकाउंट ऑपरेट करता येतं.

- आरडी अकाउंटमधील रकमेवर तुम्हाला ओव्हरड्राफ्ट किंवा कर्जसुविधाही उपलब्ध होते.

- महिला आणि मुलांसाठी आरडी हा बचतीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

- आरडी अकाउंट सुरू करणं, माहिती अपडेट करणं, या खात्यात बचत करणं तसंच आरडी अकाउंट बंद करणं आदी सुविधा तुम्हाला ऑनलाइनही मिळतात. अगदी घरबसल्या मोबाईलच्या मदतीनं तुम्ही ही सर्व कामं तुमच्या वेळेनुसार करू शकता.

रिकरिंग डिपॉझिट अकाउंट सुरु करण्याचे प्रमुख तोटे

- तुम्हाला दरमहा जितकी रक्कम या अकाउंटमध्ये जमा करायची आहे, ती निश्चित असते.

-आरडी अकाउंटसाठी लॉक-इन-पिरियड (Lock -In- Period) हा 30 दिवस ते 3 महिन्यांपर्यंत असू शकतो. अर्थात हा कालावधी बॅंक किंवा वित्तीय संस्थेनं ठरवलेला असतो. या कालावधीत आरडी अकाउंटमधून पैसे काढल्यास तुम्हाला कोणतेही व्याज मिळत नाही.

- अल्पावधीत किंवा मुदतीपूर्वी या अकाउंटमधून तुम्ही पैसे काढल्यास तुम्हाला नियमानुसार दंड आकारला जातो.

- बचतीच्या अन्य योजना किंवा पर्यायांच्या तुलनेत मिळणारा व्याज दर हा कमी असतो.

हे वाचा - RD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय; मग तुम्ही हे वाचायलाच हवं

- तुमची आर्थिकदृष्ट्या बचतीची क्षमता वाढली तरी आरडीत बचतीसाठी तुम्ही जी रक्कम निश्चित केली आहे, त्यात बदल करता येत नाही.

आरडी अकाउंटमध्ये बचत करणं हा सुरक्षित पर्याय असला तरी त्याचे फायदे आणि तोटे देखील आहेत. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करून, तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आणि आर्थिक गरजा लक्षात घेऊन बचत करणं श्रेयस्कर ठरतं.

First published:

Tags: Money, Savings and investments