मराठी बातम्या /बातम्या /मनी /

प्रसिद्ध चिनी कंपनीने भारतातील इतर व्यवसाय केले बंद; आता फक्त...

प्रसिद्ध चिनी कंपनीने भारतातील इतर व्यवसाय केले बंद; आता फक्त...

शाओमी म्हणजेच रेडमी फोनच्या युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. तुम्ही Mi Pay आणि Mi क्रेडिट अॅप वापरत असाल, तर आता हे अॅप तुम्हाला वापरता येणार नाही.

शाओमी म्हणजेच रेडमी फोनच्या युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. तुम्ही Mi Pay आणि Mi क्रेडिट अॅप वापरत असाल, तर आता हे अॅप तुम्हाला वापरता येणार नाही.

शाओमी म्हणजेच रेडमी फोनच्या युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. तुम्ही Mi Pay आणि Mi क्रेडिट अॅप वापरत असाल, तर आता हे अॅप तुम्हाला वापरता येणार नाही.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : शाओमी म्हणजेच रेडमी फोनच्या युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. तुम्ही Mi Pay आणि Mi क्रेडिट अॅप वापरत असाल, तर आता हे अॅप तुम्हाला वापरता येणार नाही. त्याचं कारण म्हणजे चायनीज स्मार्टफोन निर्माती कंपनी Xiaomi कॉर्पोरेशनने भारतामध्ये आपला फाइनॅन्शिअल बिझनेस बंद केला आहे. अलीकडेच कंपनीने प्ले स्टोअर आणि देशात आपल्या अॅप स्टोअरमधून Mi Pay आणि Mi क्रेडिट अॅप काढले आहे. Mi Pay ने युजर्सना देशातील यूपीआय नेटवर्कवर ट्रान्झॅक्शनची परवानगी दिली होती, मात्र आता तीदेखील NPCI द्वारे स्वीकृत UPI अॅप्सच्या यादीतून काढून टाकली आहे.

शाओमीचं फायनॅन्शिअल सर्व्हिस डिव्हिजन अचानक बंद होणं, हा कंपनीसाठी मोठा धक्का आहे. मार्च 2019 मध्ये Xiaomi ने भारतात Mi Pay लाँच केलं होतं. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्या वेळी देशात या एकट्या अॅपचे 20 मिलियनपेक्षा जास्त रजिस्टर्ड युजर्स होते.

हेही वाचा -  दिवाळीत महाराष्ट्राने फोडले सर्वाधिक फटाके; यंदा देशभरात इतक्या कोटींची उलाढाल

Xiaomi वर कथित टॅक्सचोरीचा आरोप

कंपनीच्या प्रवक्त्याने न्यूज एजन्सी रॉयटर्सला सांगितलं की, “मार्च 2022 मध्ये वार्षिक धोरणात्मक मूल्यांकनादरम्यान मुख्य व्यवसाय सेवांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही एमआय फायनॅन्शिअल सर्व्हिसेस बंद केल्या आहेत.”

शाओमीला भारतात कथित कर चुकवल्यामुळे कडक चौकशीला सामोरं जावं लागत आहे. एप्रिलमध्ये, भारताच्या सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने शाओमीची 67.6 कोटी डॉलर्सची मालमत्ता ताब्यात घेतली होती. कंपनीने बेकायदेशीरपणे रॉयल्टी म्हणून परदेशात पैसे पाठवल्याचा दावा तपासात करण्यात आला. मात्र, चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने हे आरोप फेटाळून लावले होते. आता कंपनीवर त्यांचे फायनॅन्शिअल अॅप्स बंद करण्याची वेळ आली आहे.

गलवान खोऱ्यातील वादानंतर वाढला तणाव

जून 2020 मध्ये पूर्व लडाखमधील सीमेवर लष्करी संघर्षानंतर भारत आणि चीनमधील राजकीय तणाव वाढला आहे. त्यामुळे अनेक चिनी कंपन्यांना भारतात व्यवसाय करणं कठीण झालं आहे. गलवान खोऱ्यातील घटनेनंतर भारत सरकारने कठोर पावलं उचलत तब्बल 300 हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. त्यावेळी सुरक्षिततेच्या कारणास्तव चिनी अॅप्सवर बंदी घालत असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं होतं. सरकारने TikTok सारख्या लोकप्रिय अॅप्सवर बंदी घातली होती, त्यामुळे अनेक चिनी कंपन्यांना भारतातील आपल्या व्यवसायाचा गाशा गुंडाळावा लागला होता. त्या एका घटनेनंतर भारतात गुंतवणूक करणाऱ्या चिनी कंपन्यांसाठी भारत सरकारने नियमही कडक केले आहेत.

First published:

Tags: Business, Smart phone, Xiaomi