नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : कोरोनाकाळात (Coronavirus) मोडकळीला आलेली अर्थव्यवस्था आता पुन्हा बाळसं धरत आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत संकल्पानंतर अनेक उद्योगधंद्यांना चालना मिळाल्याने अर्थव्यवस्था सुधारणेच्या मार्गावर असल्याचा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला. त्यांनी या आत्मनिर्भर भारत योजनेचा तिसरा भाग सादर केला.
नव्या नोकऱ्या उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांना सरकार देणार अनुदान
-कोविड (COVID-19) काळात रोजगार गमावणाऱ्यांसाठी येणाऱ्या काळात कंपन्यांनी नव्या नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकारतर्फे कंपन्यांना अनुदान देण्यात येणार आहे. केंद्र सरकार अशा कंपन्यांना दोन वर्षांसाठी देणार अनुदान देणार आहे.
-1000 पेक्षा कमी लोकांना रोजगार देणाऱ्या संस्थांना - 12 टक्के Employee's contribution आणि 12 टक्के employer's contribution असं 24 टक्के अनुदान सरकारतर्फे देण्यात येईल.
(हे वाचा-निर्मला सीतारामन LIVE: अर्थमंत्र्यांनी दिली गुड न्यूज; तिसरं आर्थिक पॅकेज जाहीर)
-1000 पेक्षा अधिक नोकरदार असलेल्या कंपन्यांना नोकरदाराच्या EPF चा 12 टक्के भाग सरकार देणार.
Aatma Nirbhar Package 3.0 चा फायदा कोणाला?
EPFO रजिस्टर्ड संस्थांमध्ये महिना 15000 पेक्षा कमी पगारावर असणाऱ्या नव्या नोकरदारांना या योजनेचा फायदा होणार आहे. नव्याने नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्यांना देखील या योजनेअंतर्गत फायदा मिळणार आहे. आत्मर्निभर भारत (Atmnirbhar Bharat)योजनेअंतर्गत सरकार रोजगाराच्या संधी उपलब्ध करत आहे. ही योजना 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू झाली असून 2 वर्षांसाठी असेल. जर एखादा नवीन कर्मचारी ईपीएफओमध्ये रजिस्टर्ड कंपनीमध्ये काम करण्यास सुरू करतो आणि त्याला 15 हजारांपेक्षा कमी पगार मिळत असेल तरच त्याला या योजनेचा लाभ घेता येईल.
त्याचप्रमाणे 1 मार्च 2020 पासून 30 सप्टेंबर 2020 दरम्यान जर तुमची नोकरी गेली असेल आणि 1 ऑक्टोबर नंतर पुन्हा रोजगार मिळाला असेल तरी देखील या सरकारी योजनेचा लाभ मिळेल. मात्र कर्मचाऱ्यांचा पगार 15 हजारांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nirmala Sitharaman