नवी दिल्ली, 21 मे : देशामध्ये सोमवारपासून टप्प्याटप्प्याने देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली. दरम्यान एएआय (Airports Authority of India) कडून विमान प्रवास करण्यासंदर्भाक एसओपी (Standard Operating Procedure) जारी करण्यात आले आहे. विमान प्रवास करताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहील. सर्व प्रवाशांना या एसओपीचे पालन करणे अनिवार्य असेल. यातील महत्त्वाचा नियम म्हणजे प्रवास करताना तुमच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप असणे अत्यंत आवश्यक आहे. 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आरोग्यसेतू आवश्यक नाही आहे. याशिवाय काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. प्रवासादरम्यान मिळणार खाद्यपदार्थ कोव्हिड संदर्भातील खबदारी घेऊनच देण्यात येतील.
All food and beverage (F&B) and retail outlets to be opened with #COVID19 precautions. Take-away to be encouraged to prevent crowding. Promote digital payments, self-ordering booths at F&B and retails outlets: Airports Authority of India (AAI) SOP to its Airports
— ANI (@ANI) May 21, 2020
एएआयने दिलेल्या माहितीनुसार विमानतळ संचालकांना प्रवासी टर्मिनलमध्ये येण्याआधीपासूनच योग्य प्रबंध आखणे गरजेचे आहे. तसच प्रवाशांनी विमानतळामध्ये जाण्याआधी थर्मल स्क्रिनिंग आवश्यक आहे. विमानतळाच्या संचालकांना प्रवाशांच्या सामानाच्या सॅनिटायझेशनसाठी देखील व्यवस्था करावी लागेल. AAI देशभरातील 100 हून अधिक विमानतळांचे व्यवस्थापन पाहते. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या मोठ्या विमानतळांचे व्यवस्थापन खाजगी कंपन्या पाहतात. संपादन - जान्हवी भाटकर

)







