Home /News /money /

Aadhar Card हरवल्यास करावा लागेल अडचणींचा सामना, वाचा कसा परत मिळवाल हा दस्तावेज?

Aadhar Card हरवल्यास करावा लागेल अडचणींचा सामना, वाचा कसा परत मिळवाल हा दस्तावेज?

आधार कार्ड (Aadhaar Card) हे भारतीयांसाठी सर्वांत महत्त्वाचं ओळखपत्र आहे. सरकारी कार्यालयं, बँका तसंच तसंच मोबाईलचं सिम घेण्यापासून ते कोविड-19 ची (Covid-19) लस (Vaccine) घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. जाणून घ्या हरवलेला आधार क्रमांक परत मिळवण्यासाठी काय कराल?

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 28 जुलै: आधार कार्ड (Aadhaar Card) हे भारतीयांसाठी सर्वांत महत्त्वाचं ओळखपत्र आहे. सरकारी कार्यालयं, बँका तसंच तसंच मोबाईलचं सिम घेण्यापासून ते कोविड-19 ची (Covid-19) लस (Vaccine) घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. त्यामुळं एखाद्या व्यक्तीचं आधार कार्ड हरवलं तर त्या व्यक्तीला अनेक अडचणी येऊ शकतात. त्या व्यक्तीला बँक खातं वापरताना, पेन्शन, रेशन कार्ड अशा अनेक सुविधा मिळणार नाहीत. यावरून आधार कार्ड सुरक्षित ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येईल. आधार कार्ड हरवलं तरी आधार क्रमांक लक्षात असला तरी नवीन आधार कार्ड मिळवणे शक्य होतं. अर्थात त्यासाठी अन्य काही माहितीही आधार डेटा बेसमध्ये (Data base) नोंदवलेला असणं आवश्यक आहे. त्यामुळं आधार क्रमांक लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कोरोना काळात (Coronavirus Pandemic) सरकारनं गरीब, गरजू लोकांना मोफत धान्य आदी सेवा पुरवल्या. पण अनेक लोकांकडे आधार कार्ड नसल्यानं अनेक गरजू व्यक्तींना आवश्यक सुविधाही मिळाल्या नसल्याच्या घटनाही घडल्या आहेत. इंडियन एक्स्प्रेसमधील एका वृत्तानुसार, अर्थतज्ज्ञ ज्यां द्रेज आणि संशोधक व्योम अनिल यांनी अशा एका घटनेची माहिती दिली आहे. एका विधवा महिलेचं आधार कार्ड हरवल्यानं तिला रेशन कार्ड, जॉब कार्ड, बँक खातं, विधवा पेन्शन (Widow Pension) अशा सुविधांपासून वंचित राहावं लागलं आहे. त्यामुळं आधार कार्ड जपून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे वाचा-IRCTC देत आहे 1,00,000 रुपये जिंकण्याची संधी, तुम्हाला करावं लागेल हे एक काम एखाद्या व्यक्तीचं आधार कार्ड हरवलं आणि तिला आधार क्रमांकही आठवत नसेल तर नवीन कार्ड मिळवणेही अडचणीच ठरतं, मात्र आधार क्रमांक लक्षात असेल तर नवीन आधार कार्ड सहजपणे मिळू शकतं. याकरता UIDAI नं नवीन आधार कार्ड मिळण्याची तरतूद केली आहे. जाणून घ्या आधार कार्ड परत मिळवण्यासाठी काय कराल? फॉलो करा या स्टेप्स >> यासाठी प्रथम UIDAI च्या https://resident.uidai.gov.in/ या वेबसाइटवर जा >> त्याठिकाणी तुमचं नाव, पत्ता, पिन कोड, जन्मतारीख इत्यादी माहिती भरून आधार क्रमांक पुन्हा मिळवता येईल हे वाचा-सोन्यामध्ये 123 तर चांदीमध्ये 206 रुपयांची घसरण, काय आहे आजचा सोन्याचा भाव >> ज्या लोकांचा मोबाइल नंबर आणि ई-मेल आधार डेटा बेसमध्ये नोंदवलेला असेल, त्यांनाच आपला हरवलेला आधार क्रमांक पुन्हा मिळू शकतो. ज्यांचा मोबाइल नंबर, ई मेल नोंदवलेला नसेल तर त्यांना आधार नंबर मिळवताना अडचण येऊ शकते. हे काम अशक्य नाही, मात्र त्यासाठी खूप वेळ लागू शकतो. त्याकरता अनेक फेऱ्या माराव्या लागू शकतात.
    First published:

    Tags: Aadhar card, Aadhar card link, Aadhar card on phone, M aadhar card

    पुढील बातम्या