Home /News /money /

IRCTC देत आहे 1,00,000 रुपये जिंकण्याची संधी, तुम्हाला करावं लागेल हे एक काम

IRCTC देत आहे 1,00,000 रुपये जिंकण्याची संधी, तुम्हाला करावं लागेल हे एक काम

IRCTC प्रवास करणाऱ्यांसाठी एक खास बक्षीस देत आहे. याकरता तुम्हाला एक व्हिडीओ बनवावा लागेल. आयआरसीटीसीने याबाबत एक ट्वीट करत माहिती दिली आहे.

    नवी दिल्ली, 27 जुलै: तुम्हाला देखील पर्यटन करण्याची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. IRCTC प्रवास करणाऱ्यांसाठी एक खास बक्षीस देत आहे. आयआरसीटीसी एक लाखाचे बक्षीस देत आहे. हे बक्षीस मिळवण्याकरता तुम्हाला एक व्हिडीओ बनवावा लागेल. Vlogers साठी आयआरसीटीसीने ही खास काँटेस्ट आणली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. CoRover सह आयआरसीटीसीने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. आयआरसीटीसीने अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत एक ट्वीट करत माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये IRCTC ने असं म्हटलं आहे की, या काँटेस्टमध्ये भाग घेण्यासाठी व्लॉगर्सना इंडियन रेल्वे आणि रेल्वेशी संबंधित इतर प्रोडक्ट्स जसं की टिकिंटिंग, केटरिंग, टूरिझम, एअर, चॅटबॉट आणि पर्यटन स्थळं इ. विषयांवर व्हिडीओ बनवावा लागेल. https://corover.ai/vlog या वेबसाइटवर तुम्हाला अधिक माहिती मिळेल. शिवाय स्पर्धेसाठी आवश्यक फॉर्मही या वेबसाइटवर भरता येईल. किती मिळेल बक्षीस? या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाने जिंकणाऱ्या स्पर्धकाला 1 लाख रुपयाचे बक्षीस, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी मिळेल. दुसऱ्या क्रमांकावरील स्पर्धकाला 50000 रुपये,  प्रमाणपत्र आणि ट्रॉफी मिळेल. तिसऱ्या क्रमांकाने जिंकणाऱ्या स्पर्धकाला  25000 रुपये,  प्रमाणपत्र आणि ट्रॉफी मिळेल. याशिवाय इतर विजेत्यांना 500 रुपयांचे गिफ्ट कार्ड आणि सर्टिफिकेट्स देखील मिळतील. 300 विजेत्यांची होणार घोषणा या स्पर्धेतून 300 विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे. सर्व राज्यातील स्पर्धक यामध्ये सहभागी होऊ शकतात. व्हिडीओची क्वालिटी आणि कंटेट पाहून स्पर्धकांची घोषणा केली जाणार आहे. हे वाचा-सोन्यामध्ये 123 तर चांदीमध्ये 206 रुपयांची घसरण, काय आहे आजचा सोन्याचा भाव स्पर्धेसाठी व्हिडीओ अपलोड केल्यानंतर त्यावर कॉपीराइट आयआरसीटीसीचे असतील. व्हिडीओ बनवणाऱ्याचे नाव त्या व्हिडीओत देण्यात आलेले असेल, पण त्यावर व्हिडीओ बनवणाऱ्याला कॉपीराइट क्लेम करता येणार नाही. काय आहेत व्हिडीओ बनवण्यासाठी विषय? IRCTC टूरिझम, IRCTC Air, IRCTC iMudra अॅप आणि वेबसाइट, IRCTC E-केटरिंग, IRCTC SBI Card, IRCTC ची नवी e-टिकिटिंग वेबसाइट, IRCTC बस बुकिंग, IRCTC तेजस ट्रेन, IRCTC वरुन रिटायरिंग रूमची बुकिंग इ. विषयांवर व्हिडीओ बनवून तो पाठवता येईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: IRCTC

    पुढील बातम्या