मुंबई, 3 मे : आधारकार्ड (Aadhar Card) आज प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्वाचा दस्तावेज आहे. ओळखीचा पुरावा म्हणून आधार जवळजवळ सर्वत्र आवश्यक आहे. हा आपल्या ओळखीचा सर्वात महत्त्वाचा पुरावा (ID Proof) आहे. एखाद्या व्यक्तीशी संबंधित महत्त्वाची माहिती आधार कार्डवर नोंदवली जाते. जसे की जन्मतारीख, पत्ता आणि मोबाईल नंबर इत्यादी त्याच्या व्यापक वापरामुळे आधारशी संबंधित फसवणूकही (Aadhar Card Fraud) वाढू लागली आहे. हे पाहता, आधार जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आधार वापरकर्त्यांना ते सुरक्षित कसे ठेवायचे याबद्दल वेळोवेळी सल्ला देत असते. आता पुन्हा एकदा UIDAI ने ट्वीटद्वारे आधार सुरक्षित करण्याचा मार्ग सुचवला आहे. यूआयडीएआयचे म्हणणे आहे की, युजरचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करावा. ट्वीटमध्ये UIDAI ने लिहिले आहे की, “तुमचा मोबाईल नंबर नेहमी आधारमध्ये अपडेट ठेवा. आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेलबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास, तुम्ही myaadhaar.uidai.gov.in/verify-email-mobile या लिंकच्या मदतीने कधीही त्याची पडताळणी करू शकता. New IPO : गुंतवणूकदारांना कमाईच्या अनेक संधी, लवकरच 9 कंपन्यांचे आयपीओ येणार यूआयडीएआयचे म्हणणे आहे की आधारशी लिंक केलेले ई-मेल आणि मोबाइल नंबर आधारशी संबंधित फसवणूक रोखण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. त्यामुळे ते नेहमी अपडेट ठेवले पाहिजेत. याचा अर्थ असा की तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल बदलल्यास तेही आधारमध्ये बदलले पाहिजेत. मोबाईल नंबर आणि ई-मेलची पडताळणी करून, तुम्ही आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल त्याच्याशी लिंक आहे की नाही हे तपासू शकता. जर तुमच्याकडे दोन मोबाईल नंबर असतील आणि तुम्ही कोणता नंबर आधारशी लिंक केला आहे हे तुम्हाला आठवत नसेल, तर तुम्हाला वेबसाईटद्वारे कोणता नंबर लिंक केला आहे हे कळू शकेल. सोनं बनावट किंवा भेसळयुक्त असल्यास कसं ओळखायचं? घरबसल्या ‘हे’ उपाय करा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी वेरिफाय करा » सर्व प्रथम http://www.uidai.gov.in वर जा. » आता ‘My Aadhar’ टॅबमधील ‘Verify Email/Mobile Number’ यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. » एक नवीन पेज उघडेल. येथे तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी एंटर करा, जे तुम्हाला पडताळायचे आहे. » त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा. » मोबाईल नंबर टाकल्यास त्यावर ओटीपी येईल, ईमेल आयडी टाकल्यास मेलवर ओटीपी येईल. » आता नेमलेल्या ठिकाणी OTP टाका. » एंटर केलेला मोबाइल क्रमांक किंवा ईमेल आयडी UIDAI रेकॉर्डशी जुळत असल्यास, मोबाइल नंबर/ईमेल आयडी रेकॉर्डशी जुळणारा संदेश स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.