मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आधार लिंक्ड पेमेंट सिस्टीम आता आणखी सुरक्षित, नव्या फीचरमुळं फसवणूकीला बसेल आळा

आधार लिंक्ड पेमेंट सिस्टीम आता आणखी सुरक्षित, नव्या फीचरमुळं फसवणूकीला बसेल आळा

आधार लिंक्ड पेमेंट सिस्टीम आता आणखी सुरक्षित, नव्या फीचरमुळं फसवणूकीला बसेल आळा

आधार लिंक्ड पेमेंट सिस्टीम आता आणखी सुरक्षित, नव्या फीचरमुळं फसवणूकीला बसेल आळा

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) एईपीएसमध्ये एक नवीन सिक्युरिटी फीचर जोडलंय. 'फिंगरप्रिंट लाइव्हलीनेस' (Fingerprint liveliness) नावाचे हे नवीन फीचर एईपीएसच्या माध्यमातून पैसे काढण्यासाठी बनावट फिंगरप्रिंट रोखण्यासाठी उपयुक्त आहे.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 सप्टेंबर: आधार कार्ड हे फक्त ओळखपत्र नसून, महत्वाचा दस्तवेज आहे. आधार कार्डवर आपली संपूर्ण माहिती असते, त्यावरून फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. दरम्यान, आता आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टमच्या (AEPS) माध्यमातून आता फसवणूक करून कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) एईपीएसमध्ये एक नवीन सिक्युरिटी फीचर जोडलंय. 'फिंगरप्रिंट लाइव्हलीनेस' (Fingerprint liveliness) नावाचे हे नवीन फीचर एईपीएसच्या माध्यमातून पैसे काढण्यासाठी बनावट फिंगरप्रिंट रोखण्यासाठी उपयुक्त आहे. सिलिकॉन पॅड्सवर बनवलेल्या फिंगरप्रिंटचा वापर करून आर्थिक फसवणूक झाल्याच्या वृत्तानंतर यूआयडीएआयने हे एक नवीन फीचर लाँच केलं आहे.

आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम हे बँक आधारित मॉडेल आहे. यामध्ये आधारवर आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वापरून पैशांचे व्यवहार केले जातात. यामध्ये, बँक ग्राहक त्याच्या आधार लिंक केलेल्या बँक अकाउंटवर बिझनेस करस्पाँडन्सद्वारे कॅश डिपॉझिट, कॅश काढणे, इंट्राबँक आणि इंटर बँक कॅश ट्रान्सफर तसेच बॅलेन्स इन्क्वायरी यासारखी कामे करू शकतो.

अचूक फिंगरप्रिंट ओळख-

cnbctv18.com च्या वृत्तानुसार, इकॉनॉमिक टाईम्सने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलंय की, या नवीन सिक्युरिटी फीचरला सॉफ्टवेअर अपग्रेडद्वारे AEPS पॉइंट ऑफ सेल मशीनमध्ये टाकण्यात आलंय. वापरले जाणारे फिंगरप्रिंट जिवंत व्यक्तीची आहे की नाही, हे याच्या माध्यमातून पीओएसला कळेल. एईपीएस एनेबेल्ड झाल्यापासून आतापर्यंत 1,507 कोटींहून अधिक बँकिंग व्यवहार झाले आहेत. त्यापैकी 7.54 लाख फसवणूकीचे व्यवहार या सिस्टममधून झाले आहेत. देशभरात एईपीएसच्या गैरवापराच्या अनेक रिपोर्ट्सनंतर नवीन सिक्युरिटी फीचर जोडण्यात आले आहे.

हेही वाचा-Tata Tiago EV: टाटाची बहूप्रतिक्षित इलेक्ट्रिक हॅचबॅक आज लॉंच; परवडणारी किंमत अन् उत्कृष्ट फीचर्स

अवैध व्यवहारांना बसेल आळा-

EasyPay चे संस्थापक आणि सीईओ शम्स तबरेझ म्हणाले की नवीन सिक्युरिटी फीचर फसवे फिंगरप्रिंट आणि बेकायदेशीर व्यवहारांना ट्रॅक करण्यास मदत करेल. हे चांगले ऑथेंटिकेशन आणि सिक्युरिटी सुनिश्चित करेल. अलीकडच्या काळात बनावट फिंगरप्रिंटच्या आधारे फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. सध्या देशात सरकारकडे सुमारे 50 लाख आधार इनेबल्ड पीओएस मशीन आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

अशा प्रकारे होत आहे फसवणूक-

मागच्या काही काळापासून, आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टममधून इतरांचे फिंगरप्रिंट वापरून आर्थिक व्यवहार होत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. सरकारी वेबसाइटवर अपलोड केलेल्या जमिनीच्या नोंदीवरून फसवणूक करणाऱ्यांनी लोकांचे फिंगरप्रिंट कॉपी केल्याचे तपासात उघड झाले आहे. हे नंतर सिलिकॉन पॅडवर करून त्यांच्या खात्यातून पैसे लंपास केले होते.

First published:

Tags: Aadhar card, Online payments