मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं का? UIDAI ने दिलीय मोठी अपडेट

तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं का? UIDAI ने दिलीय मोठी अपडेट

तुम्ही अजूनही आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची

तुम्ही अजूनही आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची

तुम्ही अजूनही आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. UIDAI ने आधार कार्ड अपडेट संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. तुम्हाला आता आधार कार्ड अपडेट करावं लागणार आहे. यूआयडीएआयने आधार कार्डबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार आता यूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार प्रत्येक व्यक्तीला 10 वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य असणार आहे. या अपडेटसाठी आधार कार्ड धारकांना ओळखपुरावा आणि अॅड्रेस प्रूफ देणं बंधनकारक आहे. यूआयडीएआयने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

या सोप्या स्टेप्स वापरून आधार कार्ड करा अपडेट

आधार कार्डच्या ऑनलाइन uidai.gov.in पोर्टलवर भेट द्या. तिथे प्रोसेस टू अपडेट अॅड्रेस हा पर्याय निवडा. तुमचा आधार नंबर आणि लिंक असलेला नंबर अपलोड करा. तुम्हाला एक OTP येईल. तुमचा नंबर वैध असल्याचं त्यावरून समजेल. त्यानंतर Proceed to Update Address वर क्लीक करा.

आधार कार्डमध्ये तुम्ही किती वेळा बदल करू शकता? काय सांगतो नियम

तुमचा 12 अंकांचा आधार कार्ड नंबर अपडेट करा. सेंड OTP म्हणा आणि आलेला OTP तिथे पोस्ट करा. त्यानंतर update address via address proof पर्याय निवडा. तुम्ही याला पर्याय म्हणून Update Address via Secret Code हा देखील पर्याय निवडू शकता.

आधार कार्डमध्ये वारंवार ही गोष्ट बदलू शकत नाही, अपडेट करण्याचे नियम पाहा

तुम्हाला अॅड्रेस प्रुफ डिटेल्स अपलोड करावे लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला अॅड्रेस प्रुफसाठी डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत. ते अपलोड केल्यानंतरच तुमचं आधारकार्ड अपडेट होईल.

First published:

Tags: Aadhar Card, Aadhar card link, Aadhar card on phone