Home /News /money /

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! DA सह पूर्ण होतील या 7 मागण्या?

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! DA सह पूर्ण होतील या 7 मागण्या?

7th Pay Commission: महागाई भत्त्यासाठी वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी लवकरच येण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 26 जून: महागाई भत्त्यासाठी (DA) वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) आनंदाची बातमी लवकरच येण्याची शक्यता आहे. मीडिया अहवालांच्या मते डीए संदर्भात नॅशनल काउन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (JCM) आणि अधिकाऱ्यांची मीटिंग 26 जून रोजी होऊ शकते. अशावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए जुलैच्या पगारासह मिळेल अशी अपेक्षा वाढली आहे. सुरुवातीला ही बैठक मे महिन्यात होणार होती, मात्र कोरोनामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. आता या बैठकीमुळे जुलैमध्ये महागाई भत्ता मिळेल याची अपेक्षा वाढली आहे. याविषयांवर होणार चर्चा 1. जे केंद्रीय कर्मचारी सीजीएचएस च्या बाहेर आहेत त्यांच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स स्कीम लागू व्हायला हवी 2. ज्या शहरात सीजीएचएस सुविधा नाही आहे, त्याठिकाणी पेन्शनर्सच्या झालेल्या खर्चासाठी रिएम्बर्समेंट मिळायला हवी 3. रुग्णालयांच्या रिएम्बर्समेंटची तरतूद हे वाचा-पर्सनल लोनपेक्षा स्वस्त आणि सहज मिळेल LIC Policy च्या बदल्यात कर्ज, वाचा सविस्तर 4. कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला भत्ता मिळायला हवा 5. कर्मचाऱ्यांना मेडिकल अॅडव्हान्स मिळायला हवा 6. 2004 नंतर आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जनरल प्रोव्हिडेंट फंडची सुविधा मिळायला हवी 7. ग्रुप इन्शुरन्स स्कीममध्ये रिव्हिजन व्हायला हवी तीन हप्ते आहेत पेंडिंग नॅशनल काउन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (JCM) ही एक केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची एक संस्था आहे. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना डीएचे तीन हप्ते मिळणं बाकी आहे. कोरोनामुळे सरकारने ही डीएची रक्कम फ्रीज केली होती. शिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांना डीआरचे हप्ते देखील दिले नव्हते. कर्मचारी आणि पेन्शनर्सचे 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 चे डीए आणि डीआर थकित आहेत. हे वाचा-Gold Outlook: भविष्यात सोनं महागणार की स्वस्त होणार? काय म्हणतायंत तज्ज्ञ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या 17 टक्के डीए मिळतो. अर्थ मंत्रालयाने जून 2021 पर्यंत 50 लाखापेक्षा जास्त केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 61 लाख पेन्शनधारकांच्या डीए आणि डीआरची वाढ थांबवली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Dearness allowance, Money

    पुढील बातम्या