Home /News /money /

PPF, सुकन्या समृद्धी योजना, NSC मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फटका, 1 जुलैपासून कमी होणार व्याजदर?

PPF, सुकन्या समृद्धी योजना, NSC मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फटका, 1 जुलैपासून कमी होणार व्याजदर?

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF), नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (NSC), सुकन्या समृद्धी योजना अशा छोट्या बचत योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करता का? मग ही बातमी तुम्हाला थोडं खट्टू करू शकते.

नवी दिल्ली, 29 जून: सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF), नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (NSC), सुकन्या समृद्धी योजना अशा छोट्या बचत योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करता का? मग ही बातमी तुम्हाला थोडं खट्टू करू शकते. केंद्र सरकार या छोट्या बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कपात करण्याचा विचार करत आहे. सरकारकडून या बातमीला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही; मात्र 30 जून रोजी होणार असलेल्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तसं झालं, तर एक जुलैपासून सुरू होणार असलेल्या दुसऱ्या तिमाही करता व्याजदरात कपात होऊ शकते. कोरोना, लॉकडाउन आदींमुळे विकासदरावर मोठा परिणाम झाला आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की विकासाची गती पुन्हा प्राप्त करायची असेल, तर वित्तीय आणि मौद्रिक अशा दोन्ही प्रकारच्या आधाराची गरज आहे. छोट्या बचत योजनांवरच्या (Small Savings Schemes) व्याजदरात (Interest Rates) कपात केल्यानंतर सरकारच्या उधारीचं प्रमाण कमी होईल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला आधार मिळेल. भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India), तसंच अन्य बँकाही व्याजदर घटविण्याच्या बाजूने आहेत. हे वाचा-Gold price today: काय आहे 22 कॅरेट सोन्याचा भाव? पाहा मुंबईतील आजचा दर एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीसाठी या छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता; मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी काही तासांमध्ये ट्वीट करून हा निर्णय मागे घेतला होता. त्या वेळी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका व्हायच्या होत्या. त्यामुळे त्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारने त्या वेळी व्याजदर कपातीचा निर्णय पुढे ढकलल्याचं सांगितलं जातं. आता मात्र तसं कोणतंही बंधन सरकारवर नाही. त्यामुळे 30 जूनपर्यंत या दरकपातीचा निर्णय सरकार घेऊ शकतं. हे वाचा-महत्त्वाची बातमी! या बँकेतील ग्राहकांनी जाणून घ्या नवा IFSC Code अन्यथा... या व्याजदरांमध्ये कपात झाली, तर छोट्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान होणार आहे. कारण कोरोना (Corona Pandemic) आणि लॉकडाउन (Lockdown) यामुळे सर्वच बँकांच्या बचत खात्यांचे, मुदत ठेवींचे आणि सर्वच प्रकारच्या बचतींचे व्याजदर घटले आहेत. अशा स्थितीत छोट्या बचत योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना आधार आहे. या योजनांचे सध्याचे व्याजदर असे आहेत. सुकन्या समृद्धी योजना - 7.6 % ज्येष्ठ नागरिक बचत योजना - 7.4 % पब्लिक प्रॉव्हिडंट फंड - 7.1 % किसान विकास पत्र - 6.9 % नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट - 6.8 % मासिक प्राप्ती खातं - 6.6 %
First published:

Tags: Corona, Investment, Money, Nirmala Sitharaman, Pandemic, PPF, Reserve bank of india

पुढील बातम्या