जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 7th Pay Commission: मोदी सरकार वाढवणार या कर्मचाऱ्यांचा पगार, लवकरच होऊ शकते घोषणा

7th Pay Commission: मोदी सरकार वाढवणार या कर्मचाऱ्यांचा पगार, लवकरच होऊ शकते घोषणा

7th Pay Commission: मोदी सरकार वाढवणार या कर्मचाऱ्यांचा पगार, लवकरच होऊ शकते घोषणा

मोदी सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्यावर विचार करत आहे. अशी माहिती मिळते आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी (Minimum Wages) 18 हजार रुपयांवरुन 26 हजार रुपये केली जाऊ शकते

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जानेवारी: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांआधी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central Government Employee) मोठं गिफ्ट मिळू शकतं. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याचा अंदाज बांधला जात आहे. मीडिया अहवालांच्या मते, मोदी सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्यावर विचार करत आहे. अशी माहिती मिळते आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी (Minimum Wages) 18 हजार रुपयांवरुन 26 हजार रुपये केली जाऊ शकते. वाढवला जाऊ शकतो फिटमेंट फॅक्टर मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होऊ शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की केंद्रीय कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्यासाठी फक्त फिटमेंट फॅक्टरचा वापर केला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्मचारी संघटना याप्रकरणी सरकारच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेणार असून, त्यानंतर किमान वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. हे वाचा- Petrol Price: पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत? 70 हून अधिक दिवस इंधनाचे भाव स्थिर जर मोदी सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय घेतला तर कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 26,000 होऊ शकते. जर बजेटआधी याला कॅबिनेटची मंजुरी मिळाली तर अशीही शक्यता आहे की अर्थसंकल्पाआधी हा निर्णय लागू केला जाईल. दीर्घकाळापासून होते आहे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी हे लक्षात घेण्यासारखे आहे की केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे कर्मचारी दीर्घकाळापासून याबाबत मागणी करत आहेत. या कर्मचाऱ्यांची अशी मागणी आहे की, त्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्क्यांवरून वाढवून 3.68 केला जावा. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या मागणीबाबत सरकार विचार करू शकते. कॅबिनेटकडूनही या मागणीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या मंजुरीनंतर यास एक्सपेंडिचरमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. हे वाचा- विश्वास बसणार नाही! असे फोटो विकून तरुण झाला मालामाल; 5 दिवसांतच कमावले कोट्यवधी वाढणार सर्व भत्ते जर मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढले, तर महागाई भत्ताही वाढेल. महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 31 टक्के आहे. डीए मूळ वेतनाच्या आधारावरच दिला जातो. म्हणजेच मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे महागाई भत्ता आपोआप वाढेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Salary
  • First Published :
जाहिरात
जाहिरात