Home /News /money /

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यासह त्यांच्या घरभाडे भत्त्यात (House Rent Allowance – HRA) देखील वाढ केली जाऊ शकते. सध्या कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळत असला तरी तो 34 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. जुलै 2021 मध्ये महागाई भत्ता वाढवून 28 टक्के करण्यात आला.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 24 जानेवारी : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Government Employee) लवकरच नवीन वर्षाची बंपर भेट ( bumper gift ) मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार या कर्मचाऱ्यांचा 18 महिन्यांचा प्रलंबित महागाई भत्ता ( Pending DA) लवकरच देणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Union Cabinet ) पुढील बैठकीत महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. 18 महिन्यांचा प्रलंबित महागाई भत्ता भेटल्यानंतर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकते. जेसीएम (JCM) लवकरच वित्त मंत्रालय, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग आणि खर्च विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. यामध्ये महागाई भत्ता थकबाकी एकरकमी देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. क्लास-1 कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता थकबाकी रुपये 11,880 ते 37,000 रुपयांमध्ये असेल. तर, क्लास-3 कर्मचाऱ्यांना 1,44,200 ते 2,18,200 रुपये महागाई भत्ताची थकबाकी म्हणून मिळतील. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने महागाई भत्ता देणार येत असल्याचे स्पष्ट केले होते. Paytm, Zomato शेअर्समध्ये मोठी घसरण, लिस्टिंगनंतरच्या नीच्चांकी पातळीवर, काय आहे कारण? घरभाडे भत्त्यातही होणार वाढ केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यासह त्यांच्या घरभाडे भत्त्यात (House Rent Allowance – HRA) देखील वाढ केली जाऊ शकते. सध्या कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळत असला तरी तो 34 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. जुलै 2021 मध्ये महागाई भत्ता वाढवून 28 टक्के करण्यात आला. त्यादरम्यान घरभाडे भत्त्यामध्येही सुधारणा करण्यात आली. सध्या घरभाडे भत्ता दर शहरी श्रेणीनुसार 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के आहेत. गेल्या ऑक्टोबरमध्ये सरकारने महागाई भत्ता 28 टक्क्यांवरून 31 टक्के केला होता. दरम्यान, वर्ष 2015 मध्ये सरकारने एक मेमोरँडम प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये म्हटले होते की, वाढत्या महागाई भत्त्यासह घरभाडे भत्त्यात वेळोवेळी सुधारणा केली जाईल. आता घरभाडे भत्त्यात पुढील सुधारणा 3 टक्के असेल असे सांगण्यात येत आहे. PM Shram Yogi MaanDhan Yojana: मजुरांना मिळणार 3000 रुपये पेन्शन, कुठे आणि कसा फॉर्म भरायचा? नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा आनंद घेऊन येऊ शकते. कारण ऑक्टोबर 2021 मध्ये सरकारने महागाई भत्ता वाढवला होता. आता अवघ्या तीन महिन्यात पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर घरभाडे भत्त्यात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात लवकरच बैठक होणार असून त्यामध्ये काय निर्णय होतो, याकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. बैठकीत सकारात्मक निर्णय होऊन नक्की वाढ मिळेल, अशी अपेक्षा अनेक कर्मचाऱ्यांना आहे.
First published:

Tags: Central government, Government employees

पुढील बातम्या