मराठी बातम्या /बातम्या /मनी /Financial Planning: नोकरी करुन कंटाळले असाल तर, योग्य आर्थिक नियोजन करुन लवकर व्हा निवृ्त्त

Financial Planning: नोकरी करुन कंटाळले असाल तर, योग्य आर्थिक नियोजन करुन लवकर व्हा निवृ्त्त

Business Idea: ‘ही’ मशिन घेऊन रस्स्त्याच्या कडेला कुठेही बसा अन् दररोज कमवा 2000 रुपये, 10 हजारात सुरू होणार काम

Business Idea: ‘ही’ मशिन घेऊन रस्स्त्याच्या कडेला कुठेही बसा अन् दररोज कमवा 2000 रुपये, 10 हजारात सुरू होणार काम

Investment Tips: गुंतवणुकीबाबत लोक अनेकदा उशीरा विचार करतात. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नोकरी मिळाल्यानंतर तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितके चांगले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 ऑगस्ट : नोकरी करताना प्रवास, कामाचा ताण यामुळे अनेकांना नोकरी नकोशी वाटते. मात्र आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरी आवश्य आहेत. तरीही अनेकांना आयुष्यभर काम करायचे नसते. त्यामुळे लोक पहिल्या 15 ते 20 वर्षांमध्ये जास्त मेहनत करून, अधिक पैसे कमवण्याचा आणि लवकर निवृत्त होण्याचा विचार करतात. मात्र यासाठी योग्यरित्या प्लानिंग महत्ताचं आहे. अनेकांना लवकर निवृत्ती घ्यायची असते, यासाठी चांगलं प्लानिंग तर हे शक्य होऊ शकतं.

योग्य प्लानिंग कसं कराल?

>> सर्वात महत्त्वाचं तुम्ही तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 50-70% बचत करा. जर तुम्ही एवढी बचत केली तर तुमच्या सध्याच्या खर्चावर परिणाम होऊ शकतो. ज्याची भरपाई तुम्ही पार्ट टाईम जॉब, साईड बिझनेस किंवा नोकरी बदलून करू शकता.

टॅलेंट पाहून आनंद महिंद्रांनी ट्विटरवरच दिली नोकरीची ऑफर; तरुणाने असं केलंय तरी काय?

>> तुमचा मासिक खर्च कमी केला जाऊ शकतो. तुम्ही सेकंड हँड वाहने खरेदी करून पैसे वाचवू शकता, तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून तुमचा खर्च कमी करता येईल. अनावश्यक खर्चासाठी क्रेडिट कार्ड वापरू नका. अशा प्रकारे नियोजन करून तुम्ही खूप पैसे वाचवू शकता. तुम्ही एफडी, डिव्हिडंड देणाऱ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करून देखील कमाई करु शकता.

>> तिसरे काम खूप महत्वाचे आहे जे गुंतवणुकीशी संबंधित आहे. यासाठी तुम्हाला अशा ठिकाणी गुंतवणूक करावी लागेल, जिथे तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळू शकेल. कारण बचत खात्यावर फारच कमी व्याज मिळते.

PPF Investment: कोट्याधीश होण्याची सरकारी स्कीम माहितीय का? आत्तापासून गुंतवणूक करा सुरू

योग्य ठिकाणी गुंतवणूक करा

गुंतवणुकीबाबत लोक अनेकदा उशीरा विचार करतात. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नोकरी मिळाल्यानंतर तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितके चांगले. यूएस सारख्या विकसित देशांमध्ये, लोक कमी किमतीचे इंडेक्स फंड किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड वापरतात. भारतातही असे अनेक इंडेक्स फंड आणि ईटीएफ मोठे होत आहेत. या फंडांचा हुशारीने वापर करून तुम्ही चांगले परतावा मिळवू शकता.

First published:

Tags: Investment, Money