1 जानेवारीपासून जीवन विमा होणार 'सरल', वाचा या पॉलिसीबाबत 5 महत्त्वाचे मुद्दे

1 जानेवारीपासून जीवन विमा होणार 'सरल', वाचा या पॉलिसीबाबत 5 महत्त्वाचे मुद्दे

विमा नियामक संस्था IRDAI ने सर्व विमा कंपन्यांना 1 जानेवारीपासून 'सरल जीवन विमा पॉलिसी' सुरू करण्यास सांगितले आहे. त्याअंतर्गत, नवीन वर्षापासून ग्राहकाला कमी प्रीमियमवर मुदत योजना खरेदी करण्याची संधी मिळेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 डिसेंबर: जर तुम्ही इन्शूरन्स घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात टर्म लाइफ इन्शूरन्स पॉलिसी खरेदी करणे अधिक सोपे होणार आहे. विमा नियामक संस्था IRDAI ने सर्व विमा कंपन्यांना 1 जानेवारीपासून 'सरल जीवन विमा पॉलिसी' सुरू करण्यास सांगितले आहे. त्याअंतर्गत, नवीन वर्षापासून ग्राहकांना कमी प्रीमियमवर मुदत योजना खरेदी करण्याची संधी मिळेल. ही एक स्टँडर्ड टर्म इन्शूरन्स पॉलिसी असेल. यामुळे ग्राहकांना कंपन्यांकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे निर्णय घेण्यात मदत होईल. जाणून घ्या या योजनेविषयी-

1. काय आहे सरल जीवन विमा?

सरल जीवन विमा पूर्णपणे टर्म लाइफ इन्शूरन्स प्रोडक्ट आहे. ही पॉलिसी 18 ते 65 वयोगटातील व्यक्तींना खरेदी करता येईल. इन्शूरन्स रेग्यूलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या पॉलिसींचा कालावधी 4 ते 40 वर्षांपर्यंत असेल. या मार्गदर्शक तत्त्वांच्या मते, सरल जीवन विमामध्ये 5 लाखे ते 25 लाखापर्यंत पॉलिसी खरेदी करता येईल.

2. सर्व कंपन्यांच्या नियम व अटी असतील सारख्या

सर्व विमा कंपन्यांच्या नियम व अटी सारख्या असतील, यामध्ये सम-अश्योर्ड (कव्हर) रक्कम शिवाय प्रीमियमही एकसमान असेल. याचा एक फायदा होईल की, क्लेम करताना वादाचं किंवा आक्षेपाचं प्रमाण कमी असेल. दरम्यान ग्राहकांनी एखादा प्लॅन निवडण्यापूर्वी विविध विमा कंपन्यांच्या या प्लॅनसाठीच्या किंमती आणि क्लेम सेटलमेंट रेशोची तुलना जरूर करावी.

(हे वाचा-या बँकेने महिलांसाठी आणल्या आहेत खास स्कीम, व्यवसाय सुरू करून मिळवा चांगली कमाई)

3. आत्महत्या प्रकरणात क्लेम मिळणार नाही

पॉलिसीधारकाचा पॉलिसीदरम्यान मृत्यू झाल्यात विम्याच्या रकमेवर नॉमिनीला क्लेम करता येईल. मात्र पॉलिसीधारकाने आत्महत्या केल्यास यामध्ये कोणताही क्लेम मिळणार नाही.

4. तीन प्रकारे करता येईल पेमेंट

या विम्यासाठी तुम्ही तीन प्रकारे पेमेंट करू शकता. सिंगल प्रीमियम, 5-10 कालावधीसाठी लिमिटेड प्रीमियम पेमेंट किंवा रेग्यूलर लाइफ लाँग मंथली प्रीमियम निवडण्याचा पर्याय आहे. कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकेल.

(हे वाचा-आजपासून SBI विकत आहे स्वस्त प्रॉपर्टी, जाणून घ्या काय आहे विक्रीची योजना)

5. 45 दिवसांच्या जुन्या पॉलिसीवर संपूर्ण कव्हर मिळेल

पॉलिसी जारी झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास अपघातातील मृत्यू वगळता अन्य कोणत्याही परिस्थितीत देय रक्कम दिली जाणार नाही. सरल जीवन विमा अंतर्गत ग्राहकांना मॅच्यूरिटीचा लाभ आणि सरेंडर मूल्य देखील मिळणार नाही.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 30, 2020, 12:14 PM IST
Tags: insurance

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading