मुंबई : तुम्हाला जर बँकेची काम करायची असतील तर तुमच्याकडे फक्त 24 तास शिल्लक आहेत. याचं कारण म्हणजे पुढचे 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. येत्या काळात बँकेचे कोणतेही महत्त्वाचे काम करायचं असेल तर ते उद्याच करून घ्या.
या महिन्याच्या अखेरीस बँक कर्मचारी संपावर जात आहेत. 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सलग चार दिवस बँका बंद राहतील. युनियन फोरम ऑफ बँक युनियन्सने दोन दिवसांच्या बँक संपाची घोषणा केली आहे. याशिवाय महिन्यातील चौथा शनिवार आणि रविवारीही बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे सलग चार दिवस बँकांचे काम होणार नाही.
28 जानेवारी 2023 - प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी बँका बंद असतात, त्यामुळे 28 जानेवारीला देशातील सर्व बँका बंद राहतील.
29 जानेवारी 2023 - रविवार, 29 जानेवारी 2023 रोजी बँका बंद राहतील.
बचत खात्यांवर कोणती बँक किती व्याज देते? एका क्लिकवर घ्या जाणून
30 जानेवारी 2023 : 30 जानेवारीपासून दोन दिवसांच्या संपाला सुरुवात. अशा तऱ्हेने शाखेत जाऊन एखादे काम सोडवायचे असेल तर त्यात काही अडचण येऊ शकते.
31 जानेवारी 2023 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधीही बँका बंद राहणार आहेत. कर्मचारी संपावर गेल्याने बँकेशी संबंधित कामावर खोलवर परिणाम होऊ शकतो.
युनियन फोरम ऑफ बँक युनियन्सच्या दोन दिवसांच्या बँक संपामुळे बँकेच्या शाखेतील बँकिंग सेवेवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकताच दिला होता. यूएफबीयूने संपाची नोटीस दिल्याचे इंडियन बँक्स असोसिएशनने सांगितलं होतं.
एआयबीईएचे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी आयएएनएसला सांगितले की, "अनेक पत्रं पाठवूनही इंडियन बँक्स असोसिएशनकडून आमच्या मागण्यांवर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
बाजारात जाता पण सुट्टे पैसेच मिळत नाही? रिझर्व्ह बँक करतेय नवा प्लान
त्यामुळे पुन्हा दोन दिवस संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच दिवसांचा आठवडा, पेन्शनची जुनी योजना, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) रद्द करणे, वेतनात बदल करणे आदी मागण्यांसाठी बँक कर्मचारी संपावर जात आहेत.
बँक ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाही कारण ज्या दिवशी बँका बंद असतील, त्या दिवशी ऑनलाइन बँकिंगची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. नेट बँकिंगच्या माध्यमातूनही तुम्ही तुमचे काम सांभाळू शकता. याशिवाय तुम्ही पूर्वीप्रमाणेच एटीएम सेवेचा ही लाभ घेऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank holidays, Bank services, Bank statement